आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका क्लिकवर शेकडो दोस्त, तरीही घोर एकाकीपणा का?

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • 'कधी-कधी मला वाटते की, फेसबुक नसते तर आम्ही अडाणीच राहिलो असतो'

सोशल मीडियामुळे त्रस्त असल्याचे कारण देत अनेक दिग्गज लोक त्याचा त्याग करीत आहेत. मलादेखील सोशल मीडियावरील काही बाबींमुळे भीती वाटायला लागते. कधी-कधी असेही वाटते की, गुगल नसते तर काय झाले असते..! प्रश्नांची उत्तरे कोणी दिली असती आणि आम्ही ठणठणपाळ नसतो का बनलो? मुंग्या, कीटकांच्या पायांविषयीची माहिती आपल्याला कोठून मिळाली असती? जगभरातील माहिती आपणास कोणी दिली असती? गुगलशिवाय विश्व-जग यास पर्यायवाचक शोधला असता तरी कसा? आता बैठकीत बसून असणाऱ्या आजोबांना कोणी डिस्टर्ब करीत नाही. नातू स्वत:च उत्तरे शोधतात... विचित्रवीर्य कोण होते? कुंती कर्णाची कुमारी माता होती. भीष्माचे हस्तिनापूरशी असलेले नातेदेखील समजावून सांगतात. म्हणूनच आजोबा-आजी एखादी अडगळ नसते ठरले तरच नवल? कधी-कधी मला वाटते की, फेसबुक नसते तर आम्ही अडाणीच राहिलो असतो. फ्रेंडशिप कधी समजू शकलो नसतो. कदाचित ते समजले असते तरी मैत्री कोणाशी केली असती? तात्पर्य, फेसबुकशिवाय फ्रेंडविहीन होऊन मेलो असतो. फेसबुकमुळेच आपले पानगळीसारखे मित्र आपणास सांगू शकतात की, आजदेखील मी भाकरीच खाल्ली आहे, हा पाहा फोटो..! अशा गोपनीय बाबींपासून सारे जग वंचित राहिले असते. फेसबुक नसते तर जाहीरपणे एखाद्याला लाइक करण्याचा प्रयत्न करूनही मार खाण्यापासून बचाव करण्याची सुविधा आणि आनंद कसा मिळाला असता? इतकेच नव्हे तर, रिकामटेकड्या लोकांना फुलटाइम बिझी राहण्याचे काम कोठून मिळाले असते? जरा विचार करा? इतक्या साऱ्या सुविधा, शेकडो मित्र, यार-दोस्त असूनही अंतर्मनात इतका निर्जन एकाकीपणा का आहे? अन्् याच वेळी मला वाटलं की, टेंपलरन नावाचा गेम नसता तर काय झालं असतं? ‘भाग मिल्खा भाग’सारखं पळू शकतो हे कधी समजलं असतं का? लांब उड्या मारू शकतो, नदी-पर्वत-डोंगर लीलया पार करू शकतो. भलेही पाच पावले दूर जाऊन आपण दुधाची पिशवी आणणार नाही, परंतु एखाद्या हीरोप्रमाणे कोलांटउड्या मारू शकतो. कँडीक्रश सागा गेम नसता तर काय झाले असते? रिक्वेस्ट कशी पाठवायची हे कधीच आपल्याला कळले नसते. केवळ रिक्वेस्ट पाठवून कुणालाही आत्महत्येस कसे प्रवृत्त करता येते हे कळले असते का?? तरीही असे वाटते की, इंटरनेट नसते तर काय झाले असते? मनुष्य सभ्य आणि सुशिक्षित झाला असता? जर हे काहीही नसते तर जुन्या जमान्याप्रमाणे एकमेकांच्या भरवशावर टाइमपास करीत राहिलो असतो. जर इंटरनेट ऊर्फ व्हर्च्युअल वर्ल्ड आणि नात्यांमध्ये योग्य संतुलन साधणे शक्य झाले असते तर आयुष्य किती सुंदर झाले असते?? नाहीतरी इंटरनेटच्या आधारे पुढे सरकत असलेल्या आयुष्याला कुणाच्या आधाराची अपेक्षादेखील नाही...

अनुज खरे
फीचर हैड, दैनिक भास्क

बातम्या आणखी आहेत...