आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hungary's David Covary Traveled 7 Countries In 24 Hours And Create Guineas World Record

हंगेरीच्या डेव्हिड कोवारीने २४ तासांत सात देश फिरून नोंदवला गिनीजमध्ये विक्रम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुडापेस्ट  - डेव्हिड कोवारी यास पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकण्याऐवजी आपल्याला खरा आनंद देणारे दुसरे काही काम केले पाहिजे, याची  जाणीव झाली. महाविद्यालयात प्रत्येक पिरिएडला हजेरी लावण्यासाठी संपूर्ण दिवस डेस्कवर बसण्यात घालविण्यापेक्षा आयुष्याचा खरा आनंद घ्यावा. जगात आपले नाव व्हावे यासाठी काहीतरी वेगळे करून दाखविण्याची त्याची इच्छा होती. या कामाचा दुसऱ्यालाही फायदा व्हावा असे त्याला वाटत असे. यामुळे त्याने साहसी काम करण्याचे ठरवले. त्याने कमी वेळेत जास्तीजास्त देश फिरण्याचा विक्रम करण्याचे मनात ठरवले होते. विक्रम आपल्या नावावर जमा झाल्यानंतर त्यापासून मिळणारी रक्कम गरजू मुलांना माहिती व तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी खर्च करणार होता. डेव्हिडने २४ तासात ७ देश फिरण्याचा विक्रम करण्याचे ठरवले. तो विक्रम काही दिवसापूर्वी यशस्वीपणे पार पाडला. यासाठी त्याने सायकलिंग करून रस्त्याची गुणवत्ताही तपासली. 

 

सायंकाळी ५ वाजता सुरू केला प्रवास, दहा तासांनंतर पहिला ब्रेक, २ तास आधीच क्रोएशियाला गेला 

़डेव्हिडने आपल्या प्रवासासंदर्भात बोलताना सांगितले, मी तीन वेगवेगळ्या स्तरावर नियोजन केले होेते. रस्त्याच्या दर्जानुसार त्यांना तीन श्रेणीत विभागले.  यात पहिली प्राथमिकता होती उत्तम रस्ता, दुसरी गरज भासल्यास वापरात येणारा  व तिसरी न वापरात येणारा रस्ता होता. 
मुख्य रस्त्याचा वापर कमीतकमी व्हावा, यासाठी कमी वाहतुकीचा रस्ता निवडला. सायंकाळी ५ वाजता माझा प्रवास सुरू झाला. दरम्यान, बॅगेत जेवणाचा डबा, कॅमेरा, जीपीएस, एनर्जी ड्रिंक्स, सलाद व काही पाकिटे होती. १० तासानंतर स्लोव्हाकियाला पोहचलो. ब्रातीस्लावा येथे पहिला ब्रेक घेतला. स्लाव्हिकिया ऑस्ट्रिया व हंगेरीच्या सीमेवर आहे. प्रवास सायंकाळी सुरू झालेला असल्याने बहुतांश वेळ अंधारात व थंडीत सायकल चालवावी लागली.  सूर्योदयापूर्वीच हंगेरीला पाेहचलो. सूर्याचे पहिली किरणे माझ्या देशात पाहण्याची खूप इच्छा होती. ही इच्छा पूर्ण झाली. याचा किती आनंद झाला म्हणून सांगू! माझे शरीर ताजेतवाने झाले. यानंतर २४ तास पूर्ण होण्याच्या २ तास आधीच म्हणजे दुपारी ३ वाजता क्रोएशियाला पोहचून जागतिक विक्रम घडवला.  यानंतर सर्वात जवळचा देश बोस्निया व हर्जेगोविना हे होते. हा प्रवास २२८ किमीचा होता. परंतु तेथे दोन तासात पोहचणे अशक्य होते आणि त्या देशात जाण्याची माझ्याकडे परवानगीही नव्हती. मी माझा विक्रम मोडण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना सांगू इच्छितो, चोवीस तासात ८ देश फिरण्यासाठी त्यांनी प्रत्येक देशात कमीतकमी वेळ थांबावे. 

 

डेव्हिडच्या आधी २०१३ मध्ये ग्लेन बर्मिस्टर यांनी २४ तासात झेक रिपब्लिक, ऑस्ट्रिया स्लोव्हाकिया व हंगेरी हे चार देश फिरून विक्रम नोंदवला होता. ग्लेननंतर २०१६ मध्ये कार्स्टेन कोहलर याने बेल्जियम, नेदरलँड्स, जर्मनी, लक्झमबर्ग व फ्रान्स फिरून २४ तासात ६ देश फिरण्याचा विक्रम केला होता. या सर्व विक्रमविरांपेक्षा वेगळा असा प्रवास डेव्हिडने केला. त्याने पोलंडपासून प्रवास सुरू करण्याची योजना आखली. पोलंडहून झेक रिपब्लिक, स्लोव्हाकिया, ऑस्ट्रिया, हंगेरी, स्लॉव्हेनिया व क्रोएशियाला पोहचून नवाच विक्रम केला. सात दिवसाचा  ३१० मैलाचा हा प्रवास पूर्ण झाला. डेव्हिडने गिनिज बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नाव नोंदविण्याचे आपले स्वप्न पूर्ण केेले.

बातम्या आणखी आहेत...