आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चंद्रपूर जिल्ह्यात दोन बिबटे आणि दोन अस्वलांची शिकार; विजेच्या तारा टाकून केली वन्यजीवांची शिकार

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • आरोपी लवकरच ताब्यात येतील असा विश्वास वनाधिकार्‍यांनी व्यक्त केला

नागपूर- चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती येथील आयुध निर्माणीच्या परिसरात दोन बिबटे आणि दोन अस्वल अशा चार वन्यजीवांची शिकार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला यामुळे वनविभाग हादरून गेला आहेण दोनच दिवसांपूर्वी भद्रावती शहराजवळच्या संरक्षण मंत्रालयाच्या चांदा आयुध निर्माणी दारूगोळा कारखान्याच्या परिसरात मुक्तपणे वावरणाऱ्या बिबट्याच्या जोडीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. 

कर्मचारी वसाहतींच्या आसपास फिरणारी ही जोडी अनेकांच्या काळजाचा ठाव चुकवुन गेली होती. समाजमाध्यमांवर या जोडीचा व्हिडिओ व्हायरल होत असतानाच आज सकाळी आयुध निर्माणी परिसरातील जंगलात चार वन्यजीव मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती वनविभागाला मिळाली.  बिबट्याच्या जोडप्यासह अस्वलाचे जोडपेही मृतावस्थेत आढळून आले. या सर्वांच्या मृतदेहांच्या प्राथमिक निरीक्षणावरून हा घातपात असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार वनाधिकाऱ्यांनी परिसराची कसून तपासणी सुरू केली. आयुध निर्माणी परिसरातील ११ केवीच्या उच्चदाब वीज वाहिनीवर तारा टाकून या चारही वन्यजीवांची शिकार झाल्याचे वनाधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशीत निष्पन्न केले आहे. आयुध निर्माणी परिसरातील घनदाट जंगलात वन्यजीवांची मोठी वस्ती आहे. हरिण व इतर प्राण्यांसह वाघ -बिबटे आणि अस्वल यांचा मुक्त वावर या भागात असतो. हीच बाब लक्षात ठेवून शिकाऱ्यांनी सापळा रचत वन्यजीवांची शिकार केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. घटनास्थळावरून शिकारीशी संबंधित काही सामुग्रीही ताब्यात घेण्यात आली असून, आरोपी लवकरच ताब्यात येतील असा विश्वास वनाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...