आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युराेपातील 30 देशांत तुफान बर्फवृष्टी; विविध घटनांत 13 ठार; हजारपेक्षा जास्त विमान उड्डाणे रद्द तर रेल्वे, रस्ते वाहतूक सेवाही ठप्प

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन- संपूर्ण युराेपात तुफान बर्फवृष्टी हाेत असून, अल्पाइन भागाला बर्फाच्या वादळाचाही फटका बसला आहे. त्यामुळे युराेपातील सुमारे ३० देशांवर माेठा परिणाम झाला आहे. यात सर्वात वाईट स्थिती जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, नाॅर्वे, स्वीडन, ग्रीस, नेदरलँड आदी देशांत निर्माण झाली असून, अनेक माेठ्या शहरांत ४ ते ८ फुटांपर्यंत बर्फ साचला आहे. साेबतच ५० किमी वेगाने वारे वाहत असल्याने एक हजारपेक्षा जास्त विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय रेल्वे व रस्ते वाहतूक सेवाही ठप्प झाली आहे. रस्त्यांवर व इतरत्र माेठ्या प्रमाणावर बर्फ साचल्यामुळे नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाल्याने ऑस्ट्रिया, नेदरलँड व जर्मनीत तर आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. बर्फाच्या वादळामुळे युराेपात आतापर्यंत १३ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यात सर्वाधिक जर्मनीत ७, ऑस्ट्रियात ५ जण ठार झाले असून, नाॅर्वेत ४ जण बेपत्ता आहेत. अनेक ठिकाणी तापमान उणे २४ अंशांपर्यंत पाेहाेचले आहे. तसेच अनेक देशांत वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. लंडनसह इतर शहरांतही पारा उणे ४ किंवा त्यापेक्षा कमी झाले. 

 

बर्फाच्या वादळामुळे अमेरिकेतही अलर्ट जारी; न्यूयाॅर्कमध्ये २ फुटांपेक्षा जास्त बर्फ साचला 
सेंट्रल न्यूयाॅर्कमध्ये १८ इंच बर्फवृष्टी झाली असून, येथे २ फुटांपेक्षा जास्त बर्फ साचला आहे. तसेच ४० किमी वेगाने वारेही वाहत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय हवामान सेवा विभागाने सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना घराबाहेर न निघण्याचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रिया, ग्रीसमध्ये शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. ग्रीसमध्ये उणे २० अंश तापमानाची नाेंद झाली असून, नेदरलँडमध्ये डच कॅरियर केएलमने युराेपकडे जाणाऱ्या १५९ विमानांची उड्डाणे रद्द केली गेली आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...