आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनेच्या जाचाला कंटाळून सासू-सासऱ्यासह पतीने उचलले टोकाचे पाऊल, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - छत्तिसगडच्या बालोद जिल्ह्यात एकाच कुटुंबातील विवाहित मुलगा, त्याची आई आणि वडिलांनी विष प्राशन केले. मुलगा जय प्रकाश साहू (28), आई केसरी बाई (55) आणि वडील रूप राम अशी या तिघांची नावे आहेत. घरातील मोठा मुलगा भोजरामची पत्नी गोपेश्वरी हिने तिघांना चहा विचारण्यासाठी आवाज दिला. प्रतिसाद मिळाला नसल्याने खोलीत जाऊन पाहिले तेव्हा तिघे जमीनीवर पडले होते आणि तोंडातून फेस बाहेर येत होता. त्या सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 


शुद्धीवर आलेला पती म्हणाला, पत्नीमुळे उचलले हे पाऊल
- जयप्रकाश साहूने सांगितल्याप्रमाणे, त्याच्या पत्नीला वैतागून कुटुंबियांनी हे पाऊल उचलले आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये त्यांचा विवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसांनंतर तो जेव्हा पत्नीला माहेरी घेऊन गेला होता. तेव्हा तिने पती जयचा अपमान केला. "मला तुझ्यापेक्षा कित्येक चांगले-चांगले स्थळ आले होते. परंतु, माझा विवाह बळजबरी कुटुंबियांनी तुझ्यासोबत लावून दिला. मला तू बिलकुल आवडत नाही. पण, विवाह झाल्यामुळे तुझ्यासोबत अडकले." असे त्याने सुनावले होते. 
- तिच्या या बोलण्यामुळे पती खूप दुखावला. रागाच्या भरात त्याने घरी परतल्यानंतर पत्नीसोबत जोरदार भांडण केले. यानंतर आपण तुझ्यासोबत राहणार नाही असे स्पष्ट केले. वारंवार हस्तक्षेप करून सासू-सासरे सुद्धा सुनेला कंटाळले होते. 
काही दिवसांनंतर सामाजिक स्तरावर एक बैठक झाली. त्या बैठकीतून सून उठून आपल्या मामाच्या घरी निघून गेली. 
- जयने सांगितले, की "समाजात आमची जी काही प्रतिष्ठा होती ती पत्नीमुळे गमावली. आम्ही कुणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहिलो नाही. लग्नाच्या 6 महिन्यांतच तिने बंड पुकारला." त्यांच्या समाजाने हा वाद मिटवण्यासाठी आणखी एक बैठक आयोजित केली होती. परंतु, त्या बैठकीत सहभागी होण्यापूर्वीच कुटुंबियांनी जीव देण्याचा प्रयत्न केला. 

बातम्या आणखी आहेत...