Home | National | Other State | Husband and brother in law misdeed with bride on first night after marriage for demanding dowry

हसत-हसत सासरी गेली होती नववधु, काही क्षणातच सगळं काही झाले उद्धवस्त, मधुचंद्राच्या रात्री तिच्या रूममध्ये आले दोन लोक..एक नवरा तर दुसरा दीर..

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 15, 2019, 05:45 PM IST

जखमी अवस्थेत रात्रभर विव्हळत होती, गँगरेप करण्यामागे आहे हे कारण

  • Husband and brother in law misdeed with bride on first night after marriage for demanding dowry

    मुजफ्फरनगर(उत्तर प्रदेश)- मुजफ्फरनगरमधून मानुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे हूंड्यासाठी एका नववधुवर मधुचंद्राच्या रात्री तिच्या पती आणि दीराने सामुहीक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित जखमी अवस्थेत रात्रभर विव्हळत होती. दुसऱ्या दिवशी तिला रूग्णालयात नेण्यात आले. घटना 6 मार्चची आहे, पण गुरूवारी माध्यामांकडून याची दखल घेण्यात आली आहे.

    पीडितेच्या भावाचा आरोप आही की, सासरकडचे जास्त पैशांची मागणी करू लागले. त्याने लग्नावर 7 लाख रूपये खर्च केले होते. त्याने सांगितले की, लग्नाच्या दिवशी सासरकडचे अनेक लोक दारूच्या नशेत होते, आणि त्याच रात्री त्याच्या बहिणीवर दोघांनी बलात्कार केला.


    पोलिसांचे काय म्हणने आहे ?
    एस.पी. आलोक कुमारने यांनी सांगितले की, याप्रकरणी आरोपींवर गँगरेपसोबतच अनेक कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि वैद्यकीय तपासणी झाल्यावरच पुढल कारवाई करण्यात येईल.

Trending