आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-पत्नीच निघाले जुळे भाऊ-बहीण, लग्नाच्या 33 वर्षांनंतर झाला खुलासा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेतील एका विवाहीत जोडप्याला चकित करणारी गोष्ट माहीत झाली आहे. 33 वर्षांनंतर ते भाऊ-बहीण तेही चक्क जुळे भाऊ-बहीण असल्याचे त्यांना समजले आहे. हे जोडपे मुलगा होण्याच्या आशेने मिसीसिपी येथील एका रूग्णालयात गेले होते. तेथेच जॅक्सन क्लिनीकच्या डॉक्टरांनी या आश्चर्यकारक घटनेचा खुलासा केला.

 

डॉक्टरांनी सांगितले की, सामान्यतः पती-पत्नीमध्ये काय संबंध आहेत हे तपासण्याचा आम्ही प्रयत्न करत नाहीत. पण या प्रकरणात लॅब असिस्टेंटने दोघांच्या प्रोफाईलमध्ये बरीच समानता दिसल्यानंतर चकित झाला. त्यांनी सांगितले की, याआधी मला वाटले की दोघांमध्ये अतिजवळचे संबंध नसतील. एखाद्यावेळेस दोघेही चुलत भाऊ-बहीण असतील. पण नमुन्यांचे परिक्षण केल्यानंतर दोघांमध्ये घनिष्ट संबंध असल्याचे आढळून आले.

 

यानंतर डॉक्टरांनी दोघांची फाइल तपासल्यानंतर दोघांची जन्मतारीख एकच असल्याचे निदर्शनास आले. यावरून ते दोघे जुळे असल्याचे डॉक्टरांना खात्री पटली. पण ही गोष्ट दाम्पत्याला माहीत आहे की, याबाबत डॉक्टरांना कल्पना नव्हती.

 

डॉक्टरांनी ही गोष्ट दोघांना सांगितली तेव्हा दोघांचा यावर विश्वास बसला नाही आणि दोघांनी हसू आले. दाम्पत्याने सांगितले की, आम्हाला अनेक लोकांनी सांगितले की आमच्यामध्ये खूपच समानता आहे. इतकेच नाही तर आमचा जन्मतारीख देखील एकच आहे. सोबतच दोघे एकमेकांसारखेच दिसतात. पण हा निव्वळ एक योगायोग आहे.

 

या प्रकरणात जोडप्यासोबत संवाद साधल्यानंतर डॉक्टरांना यामागचे कारण माहीत झाले. डॉक्टरांनी सांगितले की, या दोघांच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर दोघांना दत्तक घेतले होते. दोघांनी सारखेच बालपण व्यतित केले आहे आणि त्यामुळेच त्यांना वाटले की दोघे एकमेकांसोबत राहू शकतात.

 

दोघे लहान असताना रस्ते अपघातात त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी त्यांनी दत्तक घेण्यास मनाई केली होती. त्यामुळे दोघांना बोर्डींगमध्ये पाठवण्यात आले. तेथून दोन वेगवेगळ्या परिवारांनी त्यांना दत्तक घेतले. पण त्यावेळी त्या परिवारांना या मुलांना कोणी जुळा भाऊ किंवा बहिण असल्याचे सांगितले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...