आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 वर्षांआधी झाला होता प्रेमविवाह; दोघांनाही एकाच वेळी मुखाग्नी, पहिल्यांदा पतीचा मृत्यू नंतर मुलाला जन्म देऊन पत्नीनेही सोडले जग...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिस्सार- हरियाणात दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या एका प्रेमीयुगुलाचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रोशनलाल असे या तरुणाचे नाव असून 25 नोव्हेंबरला त्याची पत्नी प्रसुतीसाठी अग्रोहा मेडिकल कॉलेजमध्ये भरती झाली होती. रात्री पत्नीसाठी घरून जेवण घेऊन जात असताना रोशनलालच्या बाईकला ट्रकने टक्कर दिल्याने त्याचा अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी अग्रोहा येथे दाखल केले परंतु तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर मंगळवारी रात्री 12च्या सुमारास रोशनलालच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिल्यानंतर तिचीही प्राणज्योत मालवली.

 

लग्नाआधी एकाच गावात राहत होते हे दाम्पत्य

मृताचे वडील जगदीश यांनी सांगितले की, रोशनलाल आणि त्याची पत्नी लग्नाआधी एकाच गावी राहत होते. प्रेमसंबंधामुळे त्यांनी लग्न केले परंतु मुलीच्या घरच्यांनी आणि गावातील लोकांनी त्यांना खूपच विरोध केला होता. दोघांनी लग्न केल्यानंतर मुलीच्या घरच्यांनीही तिच्याशी संबंध तोडले होते.

 

हे प्रेमीयुगुल एकत्र जगले आणि एकत्र मृत्यू पावले

जगदीश यांनी सांगितल्यानुसार, या प्रेमीयुगुलांनी सोबत जीवनमरणाची शपथ घेतली होती. त्यामप्रमाणे दोघांनीही एकाच दिवशी आपला जीव सोडला. त्यामुळे दोघांनाही शेजारी-शेजारी मुखाग्नी दिला. सध्या संपूर्ण गावात या प्रेमीयुगुलांच्या मृत्यूविषयी चर्चा होत आहे.

 

नवजात बालकाची प्रकृती स्थीर

मेडिकल कॉलेजचे सीएमओ डॉ. राकेश शर्मा यांनी सांगितले की, महिलेचा मृत्यू नेमका कशामूळे झाला? हे पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर कळेल. परंतु महिलेच्या कुटुंबियांनी तिच्या मृत्यूला ईश्वरी योगायोग असल्याचा दावा केला आहे. महिलेच्या प्रसुतीनंतर नवजात बालकाची प्रकृती निरोगी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बालकाला सध्या नर्सिंग स्टाफ आणि चिकित्सकांच्या निगराणीत ठेवले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...