आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Husband And Wife Died In Car Accident In Jalgaon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावात कारची दुचाकीला जोरदार धडक, अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - औरंगाबाद राज्यमार्गावर एमआयडीसी परिसरात झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेल जळगावच्या तांबापुरा परिसरातील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. 

 

तांबापुरा परिसरात राहणारे सादिक खान अफजल खान (35) हे त्यांची पत्नी झायदा बी सादिक खान (30) यांच्यासह त्यांच्या दुचाकीवरून (MH05 U3183) जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक गिली. कार एवढी वेगात होती की, या धडकेमुळे सादिक खान आणि त्यांच्या पत्नीचा अपघातात जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मृतांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. याठिकाणी मृतांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.