आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंध..हातउसन्या पैशावरून पुण्यात झाला होता खून, कोर्टाने पती-पत्नीस सुनावली जन्मठेप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अनैतिक संबंध आणि हातउसण्या पैशावरून एका व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी पती-पत्नीला जन्मठेप आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

 

चंद्रिकाप्रसाद मंगलप्रसाद यादव (40) मृताचे नाव आहे. उदलसिंग भवानीसिंग ठाकूर (32) आणि त्याची पत्नी पूनम उदलसिंग ठाकूर (26) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

 

चंद्रिकाप्रसाद याचे पूनम ठाकूरसोबत अनैतिक संबंध होते. यातूनच चंद्रिकाप्रसाद याने पूनमला 30 हजार रुपये हातउसणे दिले होते. काही दिवसांनंतर तो पूनमकडे वारंवार पैसे मागत होता. मात्र, ती त्याला पैसे देत नव्हती. सप्टेंबर 2015 मध्ये चंद्रिकाप्रसाद हा पूनमकडे पुन्हा पैसे मागण्यासाठी गेला असता पूनम आणि उदलसिंग यांनी चंद्रिकाप्रसाद यांचा गळा दाबून खून केला. ही बाब चंद्रिकाप्रसाद याचा भाऊ नागेंद्र याला समजली होती. त्यामुळे त्याने दोघांविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली. त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले. सुनावणीदरम्यान आरोपींविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

 

बातम्या आणखी आहेत...