पुणे : पाकिस्तानातील नाटके पाहते म्हणून पत्नीवर पतीचा कोयत्याने हल्ला

नर्गिस बेडरूममध्ये जाऊन मोबाइलवरून यूट्यूबवरील पाकिस्तानी नाटक पाहत होती. त्यामुळे आसिफ भडकला व थेट कोयत्यानेच डोक्यावर वार केले

प्रतिनिधी

Mar 13,2019 10:25:00 AM IST

पुणे - मोबाइलवर पाकिस्तानी नाटक पाहते म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार पुण्यात घडला. यात नरगीस आसिफ नायब (४५, सॅलिस्बरी पार्क,पुणे) जखमी झाल्या असून तिचा पती आसिफ नायबला (५०) पोलिसांनी अटक केली आहे.


आसिफचा होर्डिंग लावण्याचा व्यवसाय आहे. तर नर्गिस गृहिणी आहेत. त्यांना दोन अपत्ये आहेत. नर्गिस यांनी मुलगा आरिफला दूध आणण्यासाठी खाली पाठवले होते. त्याने येताना दुधाची पिशवी फोडली. त्यामुळे आसिफ व नर्गिस यांच्यात भांडण झाले होते.


त्या वेळी त्यांनी तिला शिवीगाळ केली होती. तेव्हापासून ते एकमेकांशी बोलत नव्हते. सोमवारी दुपारी मुलगी ट्यूशनला गेली होती. आसिफ हा टीव्ही पाहत होता, तर नर्गिस बेडरूममध्ये जाऊन मोबाइलवरून यूट्यूबवरील पाकिस्तानी नाटक पाहत होती. त्यामुळे आसिफ भडकला व थेट कोयत्यानेच डोक्यावर वार केले. नर्गिस यांनी अडवण्यासाठी हात पुढे केला. तर हाताचा अंगठा तुटून खाली पडला. दरम्यान, नर्गिसचा आरडाओरडा ऐकल्याने शेजारी धावत आले आणि त्यांनी तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी आसिफला अटक केली आहे.

X
COMMENT