आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीने मटनाची भाजी न केल्याने पतीची मारहाण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पथ्रोट - मटनाची भाजी करण्यास नकार देणाऱ्या पत्नीला दारूच्या नशेत असणाऱ्या पतीने मारहाण केल्याची घटना कासमपूर येथे घडली. पथ्रोट पोलिस ठाण्याअंतर्गंत येत असलेल्या कासमपुर येथील संजय हरिशचंद्र बान्ते हा ८ जानेवारी रोजी रात्री दारू घेऊन आला. दरम्यान, नशेतील संजयने पत्नी पुष्पा हिला मटनाची भाजी करण्यासाठी फर्मावले. परंतु पत्नी पुष्पा हिने मटनाची भाजी करण्यास नकार देऊन चुलीजवळून उठून गेली. त्यामुळे संजयला राग आला. त्याने रागाच्या भरात कांदा कापण्याचा िवळा घेऊन पत्नी पुष्पा हिच्या कपाळावर मारून जखमी केले. त्यानंतर पुष्पा हिला अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पथ्रोट पोलिस ठाण्यात पती संजय विरुद्ध गुन्हा दाखल केला. 

बातम्या आणखी आहेत...