आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोट घेतल्याशिवाय परपुरुषासोबत राहायची पत्नी, पतीने भररस्त्यात केली मारहाण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमशेदपूर(झारखंड)- सीतारामडेराच्या भुइयांडीह छायानगरमधील महिला घटस्फोट घेतल्याशिवाय प्रियकरासोबत पळून गेली आणि बिहारच्या कटिहारमध्ये पर पुरुषासोबत राहू लागली. याची माहिती पती सईदला मिळताच त्याने, सकाळी महिलेला भर रस्त्यात मारहाण केली. नंतर संध्याकाळी उपचारासाठी रुग्णालयात गेलेल्या पत्नीला परत त्याने मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच टायगर मोबाइलचे जवान पोहोचले आणि पती-पत्नीला महिला पोलिस स्टेशनमध्ये नेले. तेथे खूप गोंधळानंतर महिला शांत झाली.


मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद सईदचे रोशनीसोबत 12 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना चार आपत्ये आहेत. रमजानमध्ये कटिहारवरून नौशाद ईदी मागण्यासाठी शहरात आला. त्यादरम्यान त्याची ओळख महिलेसोबत झाली. महिलादेखील बाजारात ईदी मागण्याचे काम करायची. 20 दिवसांपूर्वी महिलेला नौशाद पळवून घेऊन गेला. तिला रांचीच्या एका हॉटेलमध्ये ठेवले, पण एका आठवड्यानंतर ती परत घरी आली. सात दिवसांपूर्वी परत ती आपल्या मोठ्या मुलाला घेऊन पळून गेली. त्यानंतर कटिहारवरून महिलेचा मुलगा पळून आपल्या घरी आला आणि आपल्या  वडिलांना आईची माहिती दिली.


त्यानंतर 27 जूनला काही लोक कटिहारला गेले आणि नौशादच्या घरून महिलेला पकडून भुइयांडीह छायानगरमधील आपल्या घरी आणले. घरी आल्यावर महिलेला तिच्या पतीने खूप मारले. कुटुंबीयांनी कसेबसे तिला वाचवले. संध्याकाळी तिला त्रास होत होता म्हणून ती रुग्णालयात गेली. त्यादरम्यान तिचा पती रुग्णालयात गेला आणि तिला मारहाण करत बाहेर आणले. त्यानंतर माहिती मिळताच पोलिस दाखल झाले.