आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायकोने आई आणि भावाच्या मदतीने भर रस्त्यात नवऱ्याची केली धुलाई, 15 मिनीटाचा गोंधळ पाहण्यासाठी लोकांनी केली होती गर्दी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाल शर्टमध्ये पती गोपाल - Divya Marathi
लाल शर्टमध्ये पती गोपाल

इंदूर - सोमवारी दुपारी 3 वाजता पत्नीने आई आणि भावाच्या मदतीने पतीची भर रस्त्यात चपलांनी चांगलीच धुलाई केली. कोर्टाच्या सुनावणी दरम्यास गैरहजर राहिल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली आहे. नवरा-बायकोचे 15 मिनिटांचे हे भांडण पाहण्यासाठी लोकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. यानंतर नवऱ्याने आपली सुटका करून तेथून पळ काढला. 


दोघांचे एकमेकांवर वेगवेगळे आरोप
> महिलेच्या भावाने सांगितले की, गोपाल (महिलेचा पती) बहिणीला त्रास देण्यासाठी सुनावणीला हजर राहत नसल्यामुले त्याला मारहाण केली. गोपाल त्याच्या बहिणीला एका वर्षापासून त्रास देत आहे. आम्हाला तिचे लग्न करायचे आहे. पण गोपाल बहिणीला स्वतःची पत्नी सांगत आहे. खरतर त्याने घरातच हार टाकून जबरदस्तीने माझ्या बहिणीसोबत लग्न केले. याबाबत कोर्टात केस सुरू आहे. आम्ही त्याला सुनावणीसाठी बोलवत आहोत पण तो येतच नाहीये. प्रत्येकवेळी काहीना काही कारण देऊन तो सुनावणीला येण्यास टाळाटाळ करत आहे. अखेर सोमवार रोजी हॅप्पीवाला कॉलनीमध्ये आमच्या समोर आला तर त्याला चपलांनी मारहाण केली.

 

> गोपाल तीन वर्षापूर्वी रतलाम ते खरगोन बसवर क्लीनर होता. त्याच बसवर बहिणीचा पहिला पती ड्रायव्हर होता. ते गोपालला घरी घेऊन येत होते. मग त्याने बहिणीचा नंबर घेतला. तेव्हापासून तो बहिणीला फोनवर त्रास देत होता. बहिणीचे 4 वर्षापूर्वी लग्न झाले होते. रात्री फोनवर बहिणीशी लग्न करण्याच्या धमक्या देत होता. गोपालच्या अशा वागण्याने बहिणीचा काडीमोड झाला आहे.     

 

> तर दुसरीकडे गोपालने सांगितले की, ती माझी पत्नी आहे. सासरच्या लोकांना तिचे तीसरे लग्न करायचे आहे. त्यामुळे परिवारातील सदस्या मदतीने मला मारहाण केली.  


पत्नीविरूद्ध सुरू आहे देह व्यापाराचा खटला
> गोपालने सांगितले की, महिला आणि मी लग्नानंतर खरगोन येथे रूम करून राहत होतो. काही दिवसांनी माझा एक मित्राने मुलीला पळवून आणले. त्याबाबत मुलीच्या कुटूंबीयांनी सादलपूर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान मित्राने त्या मुलीचीही राहण्याची व्यवस्था आमच्याच रूमवर केली होती. काही दिवसांनंतर त्या मुलीने पत्नी विरोधात तिच्याकडून देह व्यापार करवून घेत असल्याची तक्रार पोलिसांत दिली. या प्रकरणात पत्नीला 1 महिना 6 दिवसांचा तुरूंगवास भोगावा लागला होता. सध्या या प्रकरणाची धार कोर्टात सुनावणी सुरू आहे.

 

> पत्नीच्या माहेरच्यांनी माझ्यापासून सुटका व्हावी यासाठी पत्नी 4 महिन्यांची गरोदर असताना तिचा गर्भपात केला. आता पैशांसाठी तिचे दूसरे लग्न करायचे आहे. पत्नी माझ्यासोबत सुखाने राहत होती. पण आता घरच्यांच्या दबावाखाली येऊन तिला दुसरे लग्न करायचे आहे. 

बातम्या आणखी आहेत...