आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#TripleTalaqBill: हा Video पाहिल्यावर तलाक देण्याआधी 10 वेळा विचार करेल पती, अशी केली धुलाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - सुप्रीम कोर्टाने तीन तलाकवर बंदी लावलेली असली तरी मुंबईत नुकतेच असे एक प्रकरण समोर आले. येथे आबीद मस्तान नावाच्या व्यक्तीने पत्नीला मोबाईलवर मेसेज करून तलाक दिला. त्यानंतर आरोपी पती जेव्हा काऊन्सलिंगसाठी आला तेव्हा लेडी काऊन्सिलरने त्याला चांगलीच अद्दल घडवली. मोबाईलवर तलाकचा मॅसेज पाहून काऊन्सिलर चांगलीच संतापली. तिने आबीदची अक्षरश: धुलाई केली. त्यानंतर आबीद पत्नीला सोबत न्यायलाही तयार झाला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. लोक यात काऊंसिलरचे कौतुक करत आहेत.


मीडिया रिपोर्ट्सनुसार हे दाम्पत्य भांडण सोडवण्यासाठी महिला काऊन्सिलर शबनम शेख यांच्याकडे आले होते. शबनम 'हेल्प केअर फाऊंडेशन' नावाने एनजीओ चालवतात. शबनम आधी आबीद मस्तानबरोबर बोलत होत्या. पण काहीवेळाने त्या उठून त्याच्याकडे गेल्या आणि त्याला विचारले, कोणत्या मौलानाने मॅसेजद्वारे तलाक द्यायचे सांगितले. त्यानंतर रागावलेल्या शबनमने त्याला अनेक थापडा लगावल्या. तुम्ही इस्लामला बदनाम करत असल्याचे ती वारंवार आबीदलवा म्हणत होती आणि थापडी मारत होती. शबनमने आबीदला पत्नीला घरी नेण्यास सांगितले तसेच काही त्रास द्यायचा नाही असा इशाराही दिला.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...   

 

बातम्या आणखी आहेत...