आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीने मित्राबरोबर संबंध ठेवण्यासाठी पत्नीवर आणला दबाव, नकार दिला तर केले हे कृत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनबाद -  झारखंडच्या धनबाद येथे दोन दिवसांपूर्वी एक अत्यंत क्रूर घटना समोर आली होती. त्या प्रकरणी पोलिस तपासात आता आणखी धक्कादायक खुलासा झाला आहे. पतीने आधी त्याच्या मित्राबरोबर संबंध ठेवण्यासाठी पत्नीवर दबाव टाकला. तरीही पत्नीने ऐकले नाही तर तिच्या प्रायव्हेट पार्टवर बेलन्याने  हल्ला केला. त्यानंतर या व्यक्तीची पत्नी अर्धनग्न अवस्थेत पोलिस ठाण्यात पोहोचली होती. पोलिसांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 


मद्यधुंद होता पती
या महिलेचा पती गुरुवारी मद्यधुंद अवस्थेत घरी आला होता. त्यावेळी त्याने पत्नीला त्याच्या मित्राबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पत्नीने त्याचे ऐकले नाही त्यामुले त्याने बेलने घेतले आणि पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केली. त्यात पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्या शरिरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला. ती त्याच अर्धनग्न अवस्थेत पोलिस ठाण्यात पोहोचली. पोलिसांना महिलेने आपबिती सांगितली. पोलिसांनी लगेच तिच्यासाठी साडीची व्यवस्था करत तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे. 


घर सोडून गेली होती महिला 
या महिलेवर तिच्या नवऱ्याने आधीही अत्याचार केले आहेत. 2015 मध्ये तर महिला घर सोडून निघून गेली होती. पण आरोपीने तिची समजूत घालत तिला परत आणले. पण तरीही त्याच्या वागण्यात बदल झालेला नव्हता. दिवसेंदिवस त्याचा विक्षिप्तपणा वाढत होता असे महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...