आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरसंबंधास नकार, पतीने पत्नीला पेटवले; महिलेचा मृत्यू, गुन्हा दाखल होताच पती फरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- शारीरिक संबंधास नकार देणाऱ्या पत्नीच्या अंगावर राॅकेल ओतून तिला पेटवून दिल्याची घटना बीड शहरातील पेठ बीड भागातील ढगे कॉलनीत उघडकीस आली.गंभीररीत्या भाजल्या गेलेल्या पत्नीचा बीड जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होताच आरोपी पती अय्युब पठाण फरार झाला. 


पेठ बीड भागातील ढगे कॉलनीत राहणाऱ्या सायरा पठाण आणि अय्युब पठाण या पती-पत्नीमध्ये लहान सहान कारणावरून वाद होत होते. बुधवारी रात्री दोघांत शारीरिक संबंधाच्या कारणावरून वाद झाला. तेव्हा अय्युब पठाण याने दारूच्या नशेत पत्नी सायरा पठाणच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवले. यात सायरा पठाण गंभीररीत्या भाजली. ढगे कॉलनी व मोमीनपुरा भागातील नागरिकांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पेठ बीड पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात येऊन सायरा हिचा जबाब नोंदवला. शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने आपणास पतीने जिवंत जाळल्याचे महिलेने जबाबात म्हटले. उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. 

बातम्या आणखी आहेत...