आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयावरून सुनेची अग्निपरीक्षा, तांत्रिकाच्या सांगण्यावरून चुलीतील जळते लाकुड सुनेच्या हातावर ठेवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मथुरा (उत्तर प्रदेश)- मथुरातील मगलाबरी गावात सासरच्या लोकांकडून सुनेचा हात जाळल्याची घटना समोर आली आहे. सुनेच्या चारित्र्यावर संशय घेत तांत्रिकाच्या सांगण्यावरून चुलीतील जळते लाकुड बाहेर काढून सुनेच्या हातावर ठेवले. वारंवार अत्याचार होत असल्यामुळे मुलीने सासूसह 6 जणांवर मारहाण आणि छळाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

नगलाबरी गावात राहत असलेल्या सुमानीचे लग्न 19 एप्रिल 2017 रोजी झाले होते. सुमानीची सासू नेहनी ही चारित्र्यावर संशय घेत गंभीर आरोप करायची. 19 ऑक्टोबर रोजी नेहनीने तांत्रिकाच्या सांगण्यावरून सुनेची अग्निपरिक्षा घेतली. तिने चुलीतील जळते लाकूड बाहेर काढून सुनेच्या हातावर ठेवले, त्यामुळे सुमानीचा हात गंभीररित्या भाजला. ही घटना तिच्या वडिलांना कळाली तेव्हा त्यांनी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला.  

 

पीडित सुमानीने सांगितले की, काही महिन्यांआधी पती जयबीर याने झोपेत असताना चाकूने तीचे हात कापले होते. त्यावेळीही ती पोलिसांत गेली होती पण पोलिसांनी तडजोड करत वाद मिटवला होता. 

बातम्या आणखी आहेत...