आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेस्तरॉमध्ये लंच करण्यासाठी गेले होते पती पत्नी, जेवल्यानंतर दोघांमध्ये झाले भांडण, पतीने बोलावले पोलिस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी - ऑस्ट्रेलियाच्या एका रेस्तरॉमध्ये जेवणानंतर एका कपलमध्ये भांडण झाले. ते एवढे विकोपाला पोहोचले की, पतीने पोलिसांना बोलावले. पोलिस आल्यानंतर जोव्हा लोकांना त्यांच्या भांडणाचे कारण समजले तेव्हा सर्वच आश्चर्यचकित झाले. त्यांच्या दोघांमध्ये भांडणाचे कारण होते, जेवणाचे बिल. पतीचे म्हणणे होते की, महिलेने जेवणानंतर तिच्या हिश्श्याचे अर्धे पेमेंट करण्यास नकार दिला होता. त्यावरूनच त्यांचे भांडण सुरू होते. 


नाराज पतीने बोलावले पोलिस 
- ही घटना सिडनीच्या चेट्सवूड परिसरातील एका चायनीज सी-फूड रेस्तरॉची आहे. त्याठिकाणी हे कपल जेवण्यासाठी गेले होते. काहीवेळ सर्व ठिक होते. दोघांनी प्रेमाने एकत्र जेवण केले. पण जेवण होताच त्यांचे भांडण सुरू झाले. 
- रेस्तरॉमधील लोकांना समजत नव्हते की, त्यांच्या भांडणाचे नेमके कारण काय. तेवढ्यात पतीने इमर्जन्सी क्रमांक डायल करत पोलिसांना बोलावले. पोलिस आल्यानंतर कारण समोर आले आणि सर्वच आश्चर्यचकित झाले. 
- पत्नी तिच्या वाट्याचे अर्धे पेमेंट करण्यास नकार देत असल्याचे व्यक्तीचे म्हणणे होते. त्याच्याकडे पैसे नव्हते आणि त्यावरूनच भांडण सुरू होते. 
- त्यानंतर पोलिसांनी त्यांना सांगितले की, जेव्हा एखाद्याचा जीव धोक्यात असतो तेव्हा इमर्जन्सी सर्व्हीस वापरली जाते. घरगुती वाद सोडवण्यासाठी नाही. त्यानंतर ते त्याठिकाणाहून निघून गेले. 
- या प्रकरणी पोलिसांनी स्वतः माहिती दिली. शेवटी बिल कोणी दिले माहिती नाही असेही पोलिस म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...