आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कॉन्सटेबल पत्नीचा गळा चिरुन खून करून पतीची आत्महत्या, खानापूर परिसरातील घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पती-पत्नीत नेहमी होत असत वाद

परभणी- पती-पत्नीच्या झालेल्या वादानातून पतीने पत्नीवर धारधार शस्त्राने वार करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना शनिवारी(दि.14) दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान शहरातील खानापूर भागात घडली. कृष्णा माने(वय30), कमल जाधव-माने(वय25) असे मृत पती, पत्नीचे नाव आहे.  शहरातील खानापूर भागात कृष्णा माने पत्नी, एक मुलगा, आई, वडील, भाऊ, भावजयसह राहतात. कमल जाधव-माने या नानलपेठ पोलिस ठाण्यात महिला पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. तर कृष्णा हे शेती व्यवसाय करतात. माने कुटुंब हे मुळचे पिंप्री देशमुख येथील असून गेल्या अनेक वर्षापासून ते खानापूर येथे राहतात. त्यांची दुधगाव येथे शेती आहे. कृष्णा व कमल यांचा चार ते पाच वर्षापुर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन वर्षाचा मुलगा आहे. कमल या नानलपेठ पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. तर कृष्णा हे शेती व्यतिरिक्त दुसरा कोणताही व्यवसाय करत नव्हते. कृष्णाला दारुचे व्यसन असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.  कृष्णा व कमल यांच्यात नेहमी वाद होत असत. शनिवारी देखील दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्याच वाद सुरू झाले. यावेळी कमल यांचे सासु-सासरे बाहेर गेले होते. दोघा पती-पत्नीचे वाद सुरू झाल्यामुळे भाऊ व भावजय बाहेर गेले. यावेळी कृष्णा व कमल यांच्यातील वाद वाढला. याचवेळी कृष्णा याने पत्नी कमल हिच्या मानेवर, गळावर व अंगावर धारधार शस्त्राने वार केले. गळावर वार झाल्याने मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याने कमल यांचा आतील खोलीत मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यूू झाल्याचे दिसताच कृष्णा याने स्वतच्या गळावर वार करून आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबातील सदस्य घरात आल्यावर कळाला. तात्काळ घटनास्थळी परिसरातील नागरिक दाखल झाले. पुढील तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...