आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने सासरच्या उंबरठ्यावर विष प्राशन करून केली आत्महत्या; आईला व्हाट्सअॅपवर पाठवली सुसाइड नोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कोरबा (छत्तीसगड) - एका युवकाने कौटुंबिक वादामुळे मंगळवारी रात्री आत्महत्या केली. आपल्या सासरी जाऊन सासू-सासऱ्याचा घरासमोर त्याने विष प्राशन केले. प्रकृती बिघडीत त्याला जवळच्या रूग्णालयात दाखल केले होते. पण काही तासांतच त्याचा मृत्यू झाला. मृतकाजवळ एक सुसाइड नोट मिळाली आहे. यामध्ये त्याने आत्महत्या करण्यामागचे कारण दिले आहे. 

सीएसईबी कॉलनी कोरबा पूर्वमध्ये उशीरा रात्री 1 वाजता ही घटना घडली. आजबाजूच्या लोकांना याबाबत माहिती मिळताच एकच खळबळ उडाली आहे. युवकाचा मृत्यू होताच त्याच्या पत्नीसह संपूर्ण सासरी मंडळी घराला टाळे ठोकून फरार झाले आहे. 


मृतकाचे आई-वडील म्हणाले -  एकाच गोष्टीवर अडून बसली होती सून

करगीरोड कोटा येथील रहिवासी हर्ष साहेब गुप्ता (27) याचा शिवांगी गुप्तासोबत एप्रिल 2018 मध्ये विवाह झाला होता. त्यांच्यात कौटुंबिक कारणांमुळे सतत वाद होत होते. 13 मार्च रोजी शिवांगी माहेरी गेली ती परत आलीच नाही. शिवांगीच्या सासरच्यांचे म्हणणे आहे की, ती नोकरी करण्यावर अडून बसली होती. मला नोकरी करण्याची परवानगी मिळाली नाही तर मी परत येणार नाही असेही तिने सांगितले होते. शिवांगीला समजाविण्यासाठी हर्ष कोरबा येथे गेला होता. 


विष प्राशन करण्यापूर्वी आईला व्हाट्सअॅपवर पाठवली सुसाइड नोट 
हर्ष आपल्या मामाच्या मुलीसोबत पत्नी शिवांगीला भेटण्यासाठी गेला होता. त्याने जाण्यापूर्वीच आत्महत्या करण्याचा निश्चय केला असल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबीयांच्या मते, हर्षने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या आईला सुसाइड नोट व्हाट्सअॅपवर पाठवली होती. जेणेकरून त्याच्या मृत्यूनंतर पत्र इकडे तिकडजे जाता कामा नये. मोबाइलवर आलेली सुसाइड नोट पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली. 


शिवांगीसोबत लग्न करने माझी सर्वात मोठी चूक तर सासरे आणि मामा चांगले

सुसाइड नोटमध्ये त्याने आत्महत्येसाठी आपली पत्नी शिवांगी, सासू अल्का गुप्ता आणि शिवांगीची बहीण स्वाती गुप्ताला दोषी ठरवले आहे. त्याने लिहीले की, माझे सासरे, मामा राजा आणि प्रमोद मामा चांगले आहेत. शिवांगीने लग्नावेळी नोकरी न करण्याचे सांगितले होते. पण आता तिला नोकरी करायची आहे तसेच बिलासपूर येथे परिवारापासून वेगळे राहण्याचे सांगत होती. शिवांगीचे आई-वडील भाऊ-वहिणीवर खोट्या आरोपांत फसवू म्हणत दबाव टाकत होते. त्यांनी माझ्यावरही असाच दबाव टाकला. शिवांगीसोबत लग्न करने ही माझी सर्वात मोठी चूक आहे. 


सुसाइड नोट मिळाली आहे, प्रकरणाची चौकशी सुरु आहे - पोलिस चौकी प्रभारी शर्मा 

रामपूर पोलिस चौकीचे प्रभारी ए.के शर्मा यांचे म्हणणे आहे की, युवकाने कौटुंबिक वादामुळे आत्महत्या केली असल्याची सुसाइड नोट मिळाली आहे. प्रकरणाचा तपास सुरु असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. 

बातम्या आणखी आहेत...