आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या तक्रारीमुळे भोगावा लागला तुरुंगवास, सुटल्यानंतर पत्नीला मारण्यासाठी विमान चोरून घरावर केले क्रॅश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या ऊटामध्ये डुएन यूड नावाच्या एका व्यक्तिने पत्नीला मारण्यासाठी घरावरच विमान क्रॅश केले. त्यात त्याचा स्वतःचाच जीव गेला पण घरात असलेल्या पत्नी आणि मुलाला मात्र काहीही झाले नाही. पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तिने पत्नीला मारहाण केली होती. त्याप्रकरणी पोलिसांनी कौटुंबीक हिंसाचार प्रकरणी त्याला अटक केली होती. त्यामुळे चिडलेल्या डुएनने बदला घेण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्याने एक विमान चोरी केले आणि घरावरच क्रॅश केले. 


पोलिसांनी सांगितले की, डुएन प्रोफेशनल पायलट होता. तो व्हॅनकॉन या कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी विमान उडवत होता. सोमवारी अटकेनंतर काही वेळाने त्याला जामीनावर सोडण्यात आले. त्यानंतर तो थेट कंपनीत गेला. याठिकाणाहून त्याने सेसना 525 जेट विमान घेतले आणि स्थानिक वेळेनुसार रात्री उशिरा 2:30 वाजता घरावर विमार क्रॅश केले. 

 
शेजाऱ्यांमध्ये दहशत
स्लेज बुहलर नावाच्या एका शेजाऱ्याने सांगितले की, मी सोमवारी घरावर विमान उडत असल्याचा आवाज ऐकला, येऊन पाहिले तर विमान घराकडेच येत होते. आधी असे वाटत होते की विमान डोंगरावा धडकेल पण ते शेजारच्या घरात घुसले. 

बातम्या आणखी आहेत...