आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध संबंधांचे भूत पतीच्या मानगुटीवर बसले, मग सुखी-संसाराची क्षणार्धात झाली राखरांगोळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क/ सूर्यापेट - तेलंगणाच्या सूर्यापेट जिल्ह्यातील केतेपल्ली मंडलच्या तुंगतुर्तीमध्ये मंगळवारी पत्नीचे पाय कापून पतीने आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले, तुंगतुर्ती गावातील रहिवासी जातंगी श्रीनिवासचे लग्न 13 वर्षांपूर्वी रजिता नावाच्या महिलेसोबत झाले होते. दोघांना एक मुलगा अन् एक मुलगीही आहे.

 
संशयामुळे उद्ध्वस्त झाला संसार
पोलिसांनी सांगितले, काही काळापासून या कुटुंबात दररोज भांडणे होऊ लागली होती. श्रीनिवासला संशय होता की, त्याच्या पत्नीचे परपुरुषाशी अवैध संबंध आहेत. श्रीनिवासचा हा संशय दिवसेंदिवस वाढत गेला, यामुळे दोघांमध्ये नेहमी भांडणेही होऊ लागली होती, शेवटी मंगळवारी सकाळी चाकूने त्याने पत्नीवर हल्ला चढवला आणि तिचे पाय कापले. यामुळे रजिता बेशुद्ध झाली. पत्नीला मृत समजून आरोपीने स्वत: विजेच्या तारेला चिकटून आत्महत्या केली. या दुर्घटनेत श्रीनिवासचा जागेवरच मृत्यू झाला.

 

जखमी रजिताला गंभीर अवस्थेत सूर्यापेट जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रजितानेच पोलिसांना दिलेल्या जबाबात या घटनेमागच्या कारणाचा खुलासा केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...