आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकराबरोबर बेडवर पत्नीला पाहून पती म्हणाला-जे करायचे ते करा पण.. मागणी ऐकूण पत्नीही धक्क्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - अवैध संबंधांच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केली किंवा घटस्फोट दिला अशा बातम्या नेहमी ऐकायला मिळतात. पण छत्तीसगडमध्ये एक असे प्रकरण समोर आले आहे, ज्याबद्दल ऐकूण सर्वजण तोंडात बोट घालतील. येथील बिलासपूरमध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला प्रियकराबरोबर बेडवर असताना पकडले. पण आश्चर्याची बाब म्हणजे, त्यानंतर त्याने जी मागणी केली ते ऐकूण त्याच्या पत्नीलादेखिल धक्का बसला. 


केली ही मागणी...
पतीला तिच्या प्रियकराबरोबर पाहून पतीने जराही राग दाखवला नाही. उलट तो म्हणाला तुम्हाला जे करायचे आहे ते करा. पण त्यानंतर त्याने एक मागणी केली. हे प्रकरण मिटवण्यासाठी किंवा बाहेर बोलू नये यासाठी 10 लाख रुपयांची मागणी या महिलेच्या पतीने तिच्या प्रियकराकडे केली. 


पत्नीला घेऊन पोलिसांत गेला 
प्रकरण मिटवण्यासाठी प्रियकराने महिलेच्या पतीबरोबर हा सौदा केला. पण त्यानंतर अचानक पती पत्नीला घेऊन पोलिस ठाण्यात गेला आणि प्रियकराच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याबाबत प्रियकराला समजले जेव्हा त्याने धमकी देऊन 10 लाख उकळल्याचा गुन्हा महिलेच्या पतीवर दाखल केला. 


पत्नीला रंगेहाथ पकडायचे होते 
आपल्या पत्नीचे गावातील एका तरुणाबरोबर अफेयर होते हे या व्यक्तीला माहिती होते. कारण महिला नेहमी वेगवेगळी कारणे सांगून प्रियकराला भेटायला जात होती. पतीला तिच्यावर संशय होताच. पण त्याला तिला रंगेहाथ पकडायचे होते, त्यामुळे तो तिला काही म्हणत नव्हता. एक दिवस पत्नी घरातून निघाल्यानंतर त्याने पत्नीचा पाठलाग केला आणि एका खोलीत दोघांना पकडले. 
 

बातम्या आणखी आहेत...