आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायमूर्ती महोदय, पतीने परिवार नियोजन न केल्याने, घटस्फोट हवाय - पत्नीची विनंती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेजल शुक्ल

अहमदाबाद - गुजरात उच्च न्यायालयात एक विमान कंपनीच्या महिला कर्मचाऱ्याने घटस्फोट मिळवून देण्याची विनंती केली आहे. 

काही दिवसांपूर्वी तिने न्यायालयात सांगितले, पतीने लग्नापूर्वी दिलेल्या अटीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे ितला दिवस गेले. परंतु कौटुंबिक न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर तिने गुजरात उच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला. हे प्रकरण पुण्याच्या एका मुलीचा अहमदाबादेतील मुलांशी झालेल्या लग्नाशी संबंधित आहे. दोघांचा विवाह ६ वर्षांपूर्वी झाला. २ वर्षांपूर्वी  त्यांना एक मुलगा झाला. याचिकेत महिलेने म्हटले, ती विमान कंपनीत काम करते. कंपनीच्या नियमाप्रमाणे शरीर सुडौल ठेवावे लागते. दरवर्षी या नियमांची पाहणी होते. यामुळे परिवार नियोजन केले आहे. यासाठी लग्नापूर्वीच अट घातली होती. लग्नानंतर तीन वर्षांनी आपल्याला पुन्हा दिवस गेल्याचे समजले. 
याचे मला वाईट वाटले. त्यानंतर दोघांत भांडणे होऊ लागली. संबंध ठेवताना पतीने सुरक्षा साधनाचा वापर केला नाही, असा महिलेचा आरोप आहे. यामुळेच पुन्हा दिवस गेले, तर पतीने आपण सुरक्षा साधनाचा वापर केला होता, असा दावा केला आहे. परंतु उत्पादन खराब निघाल्याने आपले लग्न मोडण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचले. पतीने ग्राहक मंचात धाव घेऊन कंपनीकडे नुकसान भरपाई मागितली आहे. तूर्त उच्च न्यायालयाने मुलाच्या भवितव्याचा विचार करून हे प्रकरण तडजोडीसाठी पाठवले आहे. तेथे दोघांचे समुपदेशन केले जात आहे. गुजरातमधील हे  प्रकरण चक्रावून टाकणारे अाहे. तसेच विवाहसंस्था किती तकलादू बनल्या आहेत, याचेही प्रत्यंतर दिसून येते. मात्र या प्रकरणाची चर्चा गाजते आहे.