आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर साेडून पळालेल्या पतीला कोर्टातच पत्नीकडून मारहाण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पत्नी व मुलीला सोडून गेला होता पती
  • दोन वर्षांनंतर समोर आलेल्या पतीला पाहून पत्नीचा संताप अनावर

जळगाव - दोन वर्षांपूर्वी वापी (गुजरात) येथे पत्नी व मुलीला सोडून गेलेल्या पतीला पुणे पोलिसांनी अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले. दोन वर्षांनंतर समोर आलेल्या पतीला पाहून पत्नीचा संताप अनावर झाला. तिने जळगाव येथील न्यायालयाच्या आवारातच पतीला मारहाण केली. सोमवारी सकाळी ही घटना घडली.सन २०१४मध्ये या विवाहितेचे धरणगाव येथील तरुणाशी लग्न झाले होते. यानंतर त्यांना एक मुलगी झाली. दरम्यान, शहरात काम मिळत नसल्याने पतीने तिला २०१७मध्ये वापी येथे नेले. तेथे तात्पुरत्या स्वरूपात खोली घेऊन दोन दिवस राहिला. यानंतर तो पत्नी व मुलीला सोडून निघून गेला होता. पत्नीने दोन-तीन दिवस शोध घेतला, नातेवाइकांकडे तपास केला; परंतु तो सापडला नव्हता. अखेर ताे हरवल्याची तक्रार दाखल केली होती.  काही दिवसांपूर्वी पिंपरी येथे पती असल्याची माहिती एका नातेवाइकाने दिली. पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्याच्याविरुद्ध वॉरंटही निघाले होते. या वॉरंटचा आधार घेत नातेवाइकांच्या मदतीने पिंपरी येथे त्याचा शोध घेतला. पिंपरी पोलिसांनी रविवारी त्याला ताब्यात घेतले. सोमवारी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले होते. या  वेळी संतापाच्या भारात पत्नीने पतीला कोर्टात बदडले.