आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनेवर शारीरिक संबंधांसाठी सासरा करायचा बळजबरी; नकार दिल्यावर पती बेदम मारायचा, गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काशीपूर (उत्तराखंड) - विवाहितेचा आरोप आहे की, सासऱ्यासोबत शारीरिक संबंधांना नकार दिल्याने तिचा पती तिला बेदम मारहाण करतो. अपर मुख्य न्यायिक मॅजिस्ट्रेट यांच्या आदेशावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

  
पतीचा अनैसर्गिक अत्याचार, तर सासऱ्याचा रेपचा प्रयत्न
एका नवविवाहितेने आपल्या पतीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार तसेच सासऱ्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 7 महिन्यांपूर्वीच तिचे लग्न झाले. नवऱ्याला एड्स असल्याची बाब तिच्यापासून लपवून ठेवण्यात आली होती.

 

असे आहे प्रकरण...
या वर्षीच 4 फेब्रुवारी रोजी बाजपूरच्या रहिवासी तरुणीचे लग्न काशीपूरच्या तरुणासोबत झाले होते. त्याचे दोन मजली घरही आहे.


विवाहितेला सांगितले, पतीला टीबी झाला...
काही दिवसांनी कुटुंबीयांनी विवाहितेला सांगितले की, तिच्या पतीला टीबीचा आजार आहे. पती औषध खाण्याच्या बहाण्याने घराच्या ग्राउंड फ्लोअरवर राहायचा आणि कधीही तिच्या रूममध्ये येत नव्हता.

 

मेडिकल रिपोर्ट पाहताच बसला धक्का...
काही दिवसांनी रूममध्ये सापडलेल्या एका मेडिकल रिपोर्टमधून तिला कळले की, तिच्या पतीला एड्स झालेला आहे.  ही रिपोर्ट काशीपूरच्या एका डायग्नोस्टिक सेंटरची 11 नोव्हेंबर 2017 रोजीची होती. विवाहिता म्हणाली की, याबाबत विचारल्यावर पतीच्या वागण्यात बदल झाला, तो तिला बेदम मारहाण करू लागला.

 

पतीने अनेकदा अनैसर्गिक अत्याचार केला...
पती वंशाला दिवा पाहिजे म्हणत तिच्यावर सासऱ्याशी संबंध ठेवण्याचा आग्रह करू लागला. विरोध केल्यावर पतीने तिच्यावर पतीने अनेकदा बळजबरी अनैसर्गिक अत्याचार केला.
आरोप आहे की, 2 जुलै 2018 रोजी सासरा तिच्या रूममध्ये शिरला. त्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. ती कशीबशी त्याच्या तावडीतून सुटून पळाली आणि आपल्या नणंदेला तिने हा प्रकार सांगितला.

 

आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल...
यावर नणंदेला तिलाच बरेवाईट ऐकवून शिवीगाळ केली. तक्रार अर्जाच्या आधारे एसीजेएम यांनी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे विवाहितेचा पती, सासरा आणि नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा, या घटनेची आणखी माहिती....   

 

 

बातम्या आणखी आहेत...