आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: पती-पत्नीच्या भांडणाचा मित्राने घेतला गैरफायदा, विवाहितेला फसवून नेले हॉटेलमध्ये अन् केले असे काही..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना - पती झालेल्या भांडणानंतर विवाहिता आपल्या 4 महिन्यांच्या मुलाला घेऊन घरातून निघून गेली. विवाहितेने या भांडणात पतीच्या मित्राला मध्यस्थी करायला पतीला घेऊन यायला सांगितले. पण मित्र एकटाच पोहोचला. त्याने विवाहितेला फसवून शहरातील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे रूम बुक केली. रूममध्ये गेल्यावर तिच्या 4 महिन्यांच्या बाळाला ठार मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार केला. यानंतर तिला ब्यास परिसरात सोडून आरोपी पसार झाला. यानंतरही तो महिलेची कधीही वाट अडवून अवैध संबंधांसाठी तिच्यावर दबाव टाकत होता.


विवाहितेने घेतली पोलिसांत धाव
या सर्वांमुळे त्रस्त विवाहितेने आपल्या घरच्यांना सगळी कहाणी सांगितली. त्यांनी ताबडतोब पोलिसांना माहिती कळवली. शहर पोलिसांनी पीडितेच्या जबाबावरून अमृतसरच्या प्रताप नगरमधील हरप्रीत सिंहविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

मोठ्या नेत्यांची ओळख सांगून प्रेशर आणतो आरोपी
22 वर्षीय पीडित विवाहिता म्हणाली की, आरोपी हरप्रीत सिंह तिच्या पतीचा मित्र आहे. आरोपीची मोठमोठ्या नेत्यांसोबत ऊठबस असते. यामुळे तो प्रेशर आणतो. पीडितेचा आपल्या पतीशी कौटुंबिक वाद सुरू आहे. यामुळे 3 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता ती तान्ह्या बाळाला घेऊन ब्यास डेरा येथे गेली. तेथे मुलगा अचानक आजारी पडल्यावर तिने आरोपीला पतीचा चांगला मित्र असल्याने फोन केला. पीडितेने यादरम्यान त्याला पतीशी सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करायची विनंती केली व सोबत येताना पतीलाही घेऊन यायला सांगितले. आरोपी दुपारी अडीच वाजता एकटा आला. तो म्हणाला की, तो घरी जाऊन पतीसोबत बोलणार आहे. असे बोलून त्याने पीडितेला मुलासकट आपल्या कारमध्ये बसवले आणि घराकडे जाण्याचा बहाणा केला. परंतु घरी न नेता त्याने कार एका हॉटेलसमोर उभी केली. यानंतर आरोपीने कुणाला तरी फोन केला. 

 

हॉटेलमध्ये सोडून गेला, रात्री नशेत तर्रर होऊन केला रेप
पीडिता म्हणाली की, लुधियानामध्ये गेल्यावर आरोपीने दोन तास महत्त्वाच्या कामासाठी जायचे असल्याचे सांगितले. तोपर्यंत माझी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करतो असे म्हणाला. त्याने घंटा घर येथील हॉटेल मॅपलमध्ये नेले. आरोपी म्हणाला की, या हॉटेलचा मालक माझा चांगला मित्रच आहे. यानंतर त्याने रिसेप्शनवर पीडितला स्वत:ची पत्नी सांगून रूम नंबर 304 बुक केली. मग पीडितेला तेथेच सोडून आरोपी निघून गेला. रात्री पुन्हा तो आला तेव्हा नशेत तर्रर होता. आरोपीने तिच्या मुलाला उचलले आणि गळा दाबून जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याने महिलेवर बलात्कार केला.

 

काय म्हणतात पोलिस?
पीडितेच्या जबाबावरून हरप्रीत सिंहवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल प्रशासनाने आयडी प्रूफची चौकशी केली होती की नाही, याचा तपास सुरू आहे.
- बलजित सिंह, तपास अधिकारी, शहर पोलिस स्टेशन

 

काय म्हणतो हॉटेल मालक?
हॉटेलमध्ये रूम घेताना तरुणाने त्याचा आईडी प्रूफ दिला आणि महिेलेची आयडी घरी विसरल्याचे सांगितले. सोबत एक बाळ असल्याने फॅमिली असल्याचे वाटून हॉटेल मॅनेजरने त्यांना रूम दिली.
- हॉटेल मालक  

 

बातम्या आणखी आहेत...