आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2-4 दिवसांत आई बनणार होती गर्भवती पत्नी, पतीने प्रेयसीच्या नादाला लागून केली निर्घृण हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुजफ्फरपूर (बिहार) - सोमवारी पहाटे 3.30 वाजता गर्भवती राजनंदनीची पती संजीव कुमारनेच गोळी झाडून हत्या केली. आधी पती म्हणाला की, सकाळी उठताच तो मॉर्निंग वॉकसाठी गेला. परतल्यावर बेडवर पत्नी रक्ताने माखलेली होती. परंतु संशय आल्याने पोलिसांनी जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये नेऊन त्याची चौकशी केली तेव्हा तो जास्त वेळा खोटे बोलू शकला नाही. म्हणाला- बाहरवालीच्या चक्करमध्ये त्याने आपल्या गर्भवती पत्नीची हत्या केली. पोलिसांनी पिस्तूलही हस्तगत केली आहे. ज्यावरून हत्या करण्यात आली होती. सूत्रांनुसार, मृत विवाहिता ही दो-चार दिवसांतच आई बनणार होती.

 
पतीच्या भावानेच दिला विवाहितेला मुखाग्नी 
संजीव मॉर्निंग वॉकवरून परतेपर्यंत घरातील इतर लोकांनाही माहिती नव्हते की, लाखोदेवीची हत्या झाली आहे. पतीनेच जेव्हा आरडाओरड केली तेव्हा गल्ली गोळा झाली. लोक हे दृश्य पाहून स्तब्ध होते. सूचना मिळताच मीनापूर पोलिस स्टेशनचे अध्यक्ष धनंजय कुमार पोलिस पथकासोबत घटनास्थळी पोहोचले. कुटुंबीयांची वेगवेगळी चौकशी करण्यात आली. घटनास्थळी दारूची बॉटल हस्तगत करण्यात आली. पोलिसांना पतीच्या वागण्यावर संशय आला. त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्यावर तो येडबडला. यामुळे त्याला ठाण्यात नेऊन कसून चौकशी करण्यात आली.
 

प्रेयसी म्हणाली होती- पत्नीचा काटा काढ, मगच मी तुझ्यासोबत राहीन
संजीवचे वर्षभरापासून दुसऱ्या महिलेशी प्रेमप्रकरण सुरू होते. 15-20 दिवसांपूर्वीच त्याच्या पत्नीला याची भनक लागली होती. ज्या महिलेशी प्रेमसंबंध होते, तिच्या पतीलाही हे कळले. संजीवच्या म्हणाला की, प्रेयसीचा आग्रह होता की पत्नीचा काटा काढल्यावरच मीसुद्धा माझ्या पतीला सोडून तुझ्यासोबत राहीन. मूल जन्मले असते तर गुंता आणखी वाढला असता. यामुळे गर्भवती असूनही मी पहाटेच तिच्या कानशिलावर बंदूक लावून गोळी झाडली. ती तेव्हा गाढ झोपेत होती. यानंतर मॉर्निंग वॉकवर निघून गेला. आणि पिस्तूल रस्त्याच्या कडेला झुडपात फेकून दिले.


4 वर्षांपूर्वी केले होते लग्न, आता प्रेमसंबंधात अडसर ठरल्याने काढला काटा
संजीवचे लाखोशी खूप आधीपासून प्रेमप्रकरण होते. 4 वर्षांपूर्वी लाखोचे लग्न समस्तीपूरमध्ये झाले. लाखोच्या सासरीही संजीव येऊ-जाऊ लागला. यादरम्यान आक्षेपार्ह अवस्थेत लाखोच्या सासरच्यांनी त्यांना पकडले. पंचायत बसली. मग ठरले की, लाखो व संजीवचे लग्न लावावे. अशा प्रकारे 4 वर्षांपूर्वी संजीवने लाखोशी लग्न केले. लाखोच्या नंतर आता मागच्या वर्षभरापासून संजीवचे दुसऱ्या एका महिलेशी प्रेमप्रकरण सुरू झाले होते. यामुळे त्याने पत्नीची हत्या केली.

 
संजीवच्या प्रेयसीचीही पटली ओळख, तिचीही होणार चौकशी
मीनापूर पोलिस म्हणाले की, संजीवच्या प्रेयसीची ओळख पटली आहे. तिचीही चौकशी होईल. हत्येसाठी प्रेरित केल्याप्रकरणी तिची भूमिका समोर आल्यास कारवाई होईल.  पोस्टमॉर्टम करून मृतदेह आल्यावर दारावर लोकांची गर्दी जमा झाली होती.  

 

बातम्या आणखी आहेत...