आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Husband Kidnapped His Wife In Amravati; Police Arrested After 50 Km Chase

अमरावतीमध्ये पतीने केले पत्नीचे अपहरण; पोलिसांनी ५० किमी पाठलाग करत पकडले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती  -  नवसारी परिसरात उभ्या असलेल्या एका तरुण्चीचे व्हॅनमध्ये आलेल्या तरुणींनी अपहरण केले. तिला जबरीने व्हॅनमध्ये बसवल्यामुळे ती किंचाळली, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी व्हॅनचा पाठलाग सुरू केला. सुमारे ५० किमीवर असदपूर गावानजीक  तरुण व तरुणीला दुचाकीवर जाताना गाठले व ताब्यात घेतले. या वेळी दाेघांनी पोलिसांना सांगितले की, आमचे प्रेमसंबंध आहेत. तसेच आठ महिन्यांपूर्वी आम्ही लग्नही केले आहे. मात्र, कुटुंबीयांना माहिती नाही. दरम्यान या प्रकरणात तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून  पोलिसांनी दोन जणांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.  

गोपाल रमेश गाडे (२५, रा. शिवर, ता. जि. अकोला) आणि शुभम नंदकिशोर झापर्डे (२५, रा. अकोला) या अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी तरुणी नवसारी परिसरात आली असता एका व्हॅनमध्ये जबरदस्तीने तिला बसवण्यात आले. त्यानंतर  व्हॅन तिला घेऊन वलगावच्या दिशेने निघून गेली. पोलिसांनी तातडीनेे घटनास्थळ गाठले. व्हॅनमध्ये आलेल्या एका तरुणीला जमावाने थांबवून ठेवले होते. पोलिसांनी तिला घेऊन व्हॅनचा पाठलाग केला. व्हॅनमध्ये गोपाल, शुभम व अपहरण झालेली तरुणी असल्याची माहिती ताब्यात घेतलेल्या तरुणीने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी पाठलाग करून दाेघांनाही पकडले.
 

पत्नी वडिलांकडे राहत असल्याने खटाटोप
या वेळी गोपाल व त्याच्यासोबत असलेल्या तरुणीने पोलिसांना सांगितले की, आठ महिन्यांपूर्वी आम्ही एका मंदिरात लग्न केले. काही दिवस एकत्र राहिलो. मात्र, तरुणीच्या कुटुंबीयांचा विरोध आहे. त्यामुळे ती वडिलांकडे राहत होती. त्यामुळे आज तिला अकोला येथे घेऊन जाण्यासाठी हा खटाटोप केल्याचे गोपालने पोलिसांना सांगितले. दरम्यान, या प्रकरणात तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी सायंकाळी गोपाल व त्याचा मित्र शुभम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.