आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Husband Killed By Wife Lover In Extramarital Affair Ludhiana News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेहमी टूरवर राहायचा पती, मग शेजारी इंजिनिअरशी पत्नीचे जुळले प्रेम, व्हॉटसअपच्या गप्पा बेडरूमपर्यंत पोहोचल्या... पतीची आडकाठी होताच प्रियकराने बनवला काटा काढण्याचा प्लॅन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना - एसबीएस नगर सिटी सेंटरमध्ये 01 जानेवारी रोजी आग लावून फेकण्यात आलेल्या एमआर (मेडिकल रिप्रेजेंटेटिव्ह)च्या प्रकरणातील गूढ उकलले आहे. पोलिसांनी शेजारच्या 24 वर्षीय सिव्हिल इंजीनियर आणि आर्किटेक्ट अरुण राणा यांना अटक केली आहे. राणाचे एमआरच्या पत्नीशी अवैध संबंध होते. याबद्दल एमआरला माहिती मिळाली होती, यानंतर तो दररोज पत्नीला टोकू लागला होता. अरुणनेच त्याला जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता.

 

असे आहे पूर्ण प्रकरण...

दुगरी पोलिसांनी संत विहार एक्स्टेंशनमधील पीडित दीपेशच्या तक्रारीवरून अरुण राणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे, दीपेश 80 टक्के भाजलेला आहे. त्याची प्रकृती गंभीर बनलेली आहे. एडीसीपी सुरिंदर लांबा आणि एसीपी रमनदीप सिंह भुल्लर म्हणाले की, पोलिसांनी गस्तीदरम्यान एक जानेवारी रोजी सिटी सेंटरच्या बंद पडलेल्या बिल्डिंगमध्ये एक जळालेला मृतदेह आढळला होता. ओळख पटवल्यावर कळले की, तो दीपेश सेठी (33) आहे. दीपेशच्या जबाबानंतर अरुणला ताब्यात घेऊन चौकशी करताच प्रकरणाचा खुलासा झाला.

 

एमआर राहायचा टूरवर, दोघांमध्ये वाढली जवळीक
एएसआय सुनील कुमार म्हणाले, आरोपी अरुण कुटुंबात एकुलता एक मुलगा आहे. त्याने 2018 मध्ये सिव्हिल इंजीनियरिंग डिग्री पूर्ण केली. काही महिन्यांपूर्वीच 3-डी मॅप बनवण्याची नोकरी सुरू केली. तर दीपेश जनरल रेमडी कंपनीत मेडिकल रिप्रेजेंटेटिव्ह आहे. तो जम्मू-कश्मीर आणि पंजाबचा हेड आहे. आरोपी 2 राज्यांचा एमआर असल्याने बहुतांश वेळा टूरवरच राहायचा. घरी त्याची 27 वर्षीय पत्नी आणि 5 वर्षांचा मुलगा होते. शेजारी असल्याने राणा नेहमी दीपेशच्या घरी येत-जात होता. काही काम असल्यावर महिलाही त्याला बोलवायची. यादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली. व्हॉट्सएपवर एकमेकांशी ते बोलू लागले. आणि हे सर्व बेडरूमपर्यं पोहोचले. ते बाहेरही फिरायला जायचे. याची माहिती दीपेशला मिळाली होती.


काही दिवस सिटी सेंटरच्या जवळ फिरून रेकी केली, मग जाळले...
आरोपी राणा म्हणाला, तो दररोज पत्नीला मारहाण करायचा. हे मला पाहावत नव्हते. यामुळे दीपेशचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. त्याने अनेक जागांवर रेकी केली, पण जागा मिळाली नाही. मग त्याने सिटी सेंटर हे ठिकाण नक्की केले. दोघेही (राणा आणि त्याचा मित्र राकेश) यांनी न्यू इयरच्या बहाण्याने दीपेशला दारू पाजून मारण्याचा विचार केला. 31 डिसेंबरच्या  रात्री त्याला गोबिंद नगरातील आपल्या मित्रांच्या घरी नेले. तेथे त्यांनी पार्टी केली. आरोपीने त्याला जास्त दारू पाजून बेशुद्ध केले. दोघेही अॅक्टिव्हावर फिरायला निघाले. वाटेत पोलिसांची नाकेबंदी असल्याचे सांगून आरोपीने त्याला सिटी सेंटरला नेले. तेथे त्यांनी अॅक्टिवा थांबवली आणि दीपेश लघवीसाठी उतरला. तेवढ्यात आरोपीने पेट्रोलची बॉटल काढून आधी दीपेशचे पाय, मग पाठीवर पेट्रोल टाकले आणि सिटी सेंटरच्या आत नेऊन आग लावली.


80% टक्के भाजलेला एमआर अजूनही गंभीर
उंचावरून पडल्याने दीपेशची आग बहुतांश विझली होती. मग पोलिसांनी त्याला रुग्णालयात हलवले. दीपेशला शुद्ध आल्यानंतर आधी तो राकेशचे नाव घेत होता, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा दारूची नशा उतरली तेव्हा त्याने अरुणबद्दल सांगितले. पोलिसांनी अरुणला ठाण्यात बोलावून चौकशी केली असता त्याने नकार दिला. स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगून तो मित्रांसोबत पार्टी करत असल्याचे म्हणाला. परंतु संशय बळावल्याने पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.