Home | National | Other State | Husband Killed First Wife and 9 Year Old Daughter in Katihar Bihar

पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने शेतात केले खोदकाम, जमिनीतून निघाले आई आणि मुलीचा मृतदेह, बेपत्ता असल्याची तक्रार करणाराच निघाला मारेकरी...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 13, 2019, 02:18 PM IST

वडिलांना फोनवर मिळाली होती बेपत्ता असल्याची माहिती

  • कटिहार(बिहार)- दुसरी पत्नी आणि हूंड्याच्या अमिषापोटी आरोपीने आपल्या पहिल्या पत्नीला आणि मुलीला जीवे मारल्याची घटना समोर आली आहे. चक पुरावे मिटवण्यासाठी त्याने दोघींचा मृतदेह मक्याच्या शेतात पुरले. घटना मनसाही तालुक्यातील मरंगी चकमन गावची आहे. पत्नीचा खून केल्यानंतर त्याने सासऱ्याला फोन करून पत्नी बेपत्ता असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याने पोलिस ठाण्यात तक्रारदेखील दाखल केली. मृतदेह मिळाल्यानंतर आरोपी आपली दुसरी पत्नी आणि मुलांसोबत फरार झाला आहे.

    सोबत राहत होत्या दोन्ही पत्नी
    मोहनपूर गावातील रहिवासी स्वीटी आणि चकमन गावातील रहिवासी गिरानंद मंडल यांचे 12 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर गिरानंद हूंड्यासाठी स्वीटीवर आत्याचार करू लागला. पण हूंडा मिळाला नाही म्हणून त्याने 6 वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले. दुसऱ्या बायकोकडून त्याला दोन मुले झाले आणि ते सगळे सोबत राहत होते. दोन्ही पत्नी घरात असल्यामुळे नेहमी वाद व्हायचे. अनेकवेळा त्यांचा वाद पंचायतीत गेला पण काही तोडगा निघाला नाही.


    ग्रामस्थांच्या संशयाने कळाले सत्य
    मृत महिलेचे वडील अजय यांनी सांगितले की, 7 एप्रिलला गिरानंदने फोन करून पत्नी आणि मुलगी बेपत्ता असल्याचे सांगितले. त्यानंतर संशय आल्याने अजय यांनी पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी ग्रामस्थांनी विचारले असता त्यांच्याकडून कळाले की, गिरानंदने शेतात खोदकाम केले होते. पोलिसांनी संशयाच्या आधारे शेतात खोदकाम कले असता, महिला आणि तिच्या मुलीचा मृतदेह मिळाला.

Trending