आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात सरकारी वकील पत्नीचा चारित्र्याच्या संशयातून पतीकडून खून

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्हा न्यायालयात सहायक सरकारी वकील पदावर कार्यरत असलेल्या पत्नीचा  डॉक्टर पतीने तोंड व नाक दाबून खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे.  


राखी ऊर्फ विद्या भरत पाटील (३७, रा. जामनेर) असे मृत वकील महिलेचे नाव आहे. भुसावळ तालुक्यातील बोहर्डे हे विद्या यांचे माहेर आहे, तर त्यांचे वडील प्रताप नारायण पाटील व आई सैनाबाई या औरंगाबाद येथे प्रिया या लहान मुलीकडे राहतात, तर पती डॉ. भरत यांचे जामनेरात क्लिनिक आहे. विद्या यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना रुग्णालयात घेऊन जात अाहे, अशी माहिती रविवारी मध्यरात्री डॉ. भरत यांनी सासरच्या लोकांना फोनवरून दिली.

 

यानंतर सासरच्या लोकांनी थेट जामनेर येथे धाव घेतली. मात्र, घरी कोणीच सापडले नाही.

विद्या यांच्या नातेवाइकांनी भुसावळच्या रुग्णालयात शोध घेतला. तिथेही डॉ.भरत सापडले नाहीत. अखेर पहाटे ३.३० वाजता सर्व जण डॉ. भरत यांचे मूळ गाव असलेले बेलखेड (ता. भुसावळ) येथे गेले. तोपर्यंत विद्या यांचा मृत्यू झाल्याची माहिती सासरच्या लोकांनी दिली.

 

तसेच अंत्यसंस्कार करण्याचीही तयारी केली होती. मात्र, घटना संशयास्पद असल्यामुळे माहेरच्या लोकांनी मृतदेह वरणगावच्या रुग्णालयात नेला. शवविच्छेदनात त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.

बातम्या आणखी आहेत...