आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी व चार वर्षांच्या मुलाला ठार मारून आत्महत्येचा प्रयत्न, घरगुती वादातून टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी - नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मोरेवाडी (वांबोरी) या गावामध्ये पत्नी आणि चारवर्षीय मुलाची हत्या करून पतीने स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी भारत ज्ञानदेव मोरे (३०, मोरेवाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संध्या (२८) आणि साई (४) अशी मृतांची नावे आहेत. 


घरगुती वादातून भारत मोरेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.  संध्याचे माहेर नेवासे तालुक्यातील तामसवाडी आहे. दहा वर्षांपूर्वी भारत व संध्याचे लग्न झाले होते. भारत शेती करतो. या दाम्पत्याला साई (४) व कार्तिकी (५) ही दोन मुले होती. कार्तिकी ही तामसवाडी येथे मामाकडे राहते. रविवारी भारत आणि संध्या यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याची चर्चा आहे. या वादातून रागाच्या भरात भारतने पत्नी संध्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यामुळे संध्या जमीनीवर कोसळली. त्यात तिचा मृत्यू झाल्याचे लागलीच भारतच्या लक्षात आले. यावेळी मुलगा साई हा सुद्धा तिथेच होता. संध्याला ठार केल्यानंतर भारतने चिमुरड्या साईवरही तीक्ष्ण शस्त्राने वार केले आणि त्याचीही हत्या केली. दोघांची हत्या केल्यानंतर तो घराबाहेर पळाला आणि जवळच्याच विहिरीत उडी मारली. दरम्यान, विहिरीत उडी मारताना त्याला काही लोकांनी पाहिले आणि त्यांनी भारतचे प्राण वाचवले. दरम्यान, पोलिसांना घटनेबाबत कळवण्यात आले. पोलिसांनी संध्या व साईचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वांबोरी ग्रामीण रूग्णालयात नेले. दरम्यान, वांबोरी ग्रामीण रूग्णालयातील डाॅक्टर नगर येथे वास्तव्यास असल्याने शवविच्छेदनासाठी नातेवाईक व पोलिसांना तब्बल दीड तास प्रतीक्षा करावी लागली.