आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याने पतीने पत्नीची फावड्याने वार करून केली हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाजीपूर(उत्तर प्रदेश)- येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका पतीने आपल्या आवडीच्या पक्षाला पत्नीने मतदान केले नाही म्हणून तिची फावड्याने हत्या केली. गाजीपूरमधील सैदपूर तालुक्यातील तरवनिया गावातील तरूणाने सोमवारी सकाळी आरोपी पतीने पत्नी नीलम(25) ची हत्या केली. महिलेच्या माहेरकडच्यांनी पतीवर हूंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप लावला आहे.

 

मृत महिलेच्या आईच्या तक्रारीनंतर पती, सासू आणि सासऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्री आरोपीला अटक केले आहे. खानपूरची रहिवासी नीलम(25) चे लग्न 19 जून 2014 ला रामबचन रामसोबत झाले होते. 


लग्नानंतर पती-पत्नीत नेहमी लहान-मोठे वाद व्हायचे, घटनेच्या आदल्या रात्रीही त्यांच्यात वाद झाला होता. दुसऱ्या दिवसी सकाळी बसपा आणि भाजपला मतदान करण्यावरून त्यांच्यात परत वाद झाला. पतीने बसपाच्या उमेदवाराला मतदान करण्यास सांगितले पण पत्नीने भाजपच्या उमेदवारास मतदान केले, म्हणून नाराज झालेल्या पतीने महिलेवर फावड्याने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर आसपासच्या लोकांनी आरडा-ओरड केल्यानंतर तो पळून गेला. रात्री पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
 

बातम्या आणखी आहेत...