आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 10 वर्षांनी पत्नीवर ट्रक ड्रायव्हर पतीने घेतला संशय, म्हणायचा या 4 मुली माझ्या नाहीत, मग एका दिवशी घडले असे काही..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतियाळा - एका पतीने पत्नीची चारित्र्याच्या संशयामुळे बुधवारी सकाळी 10.30 वाजता कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. आरोपी हत्या केल्यानंतर पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे आणि मृतदेह सरकारी रुग्णालयाच्या मोर्चरीमध्ये ठेवले आहे. महिलेला 5 मुले-मुली होती. तिला 4 मुली आणि 1 मुलगा आहे. मृत महिलेचे नाव  मनप्रीत कौर असून तिचे काका अमर सिंह म्हणाले की, आरोपी जावई लखविंदर सिंह त्यांच्या पुतणीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. तो तिच्या चार मुलींना आपले मानत नव्हता. यावरून त्याने अनेकदा तिला मारहाणही केली होती.

 

रक्तबंबाळ होता देह अन् आरोपी जवळच बसलेला...

10 वर्षांत 10 वेळा कौटुंबिक भांडण मिटवून मुलीला परत सासरी पाठवले, परंतु आरोपी जावई सुधारला नाही. ते म्हणाले की, बुधवारी सकाळी 11.30 वाजता त्यांना एका नातेवाइकाने फोन करून या घटनेची माहिती दिली. यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा पाहिले तर पुतणीचा मृतदेह रूममध्ये रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता आणि जावई तेथेच बसून होता. वडील बलजिंदर सिंह म्हणाले की, बुधवारी सकाळी 7 वाजता त्यांच्या मुलीने आपल्या भावाशी फोनवर बोलणे केले आणि पतीसोबत झालेल्या भांडणाची माहिती दिली होती. यानंतर त्यांना थेट मुलीची हत्या झाल्याचाच फोन आला.

 

प्रत्येक वेळी मारल्यावर मागायचा माफी
वडील म्हणाले की, कंबाइन ड्रायव्हर असलेला त्यांचा जावई अनेक दिवसांनंतर घरी यायचा आणि येताच दारूच्या नशेत मुलीला बेदम मारहाण करायचा. यामुळे त्रस्त होऊन मुलगी अनेक वेळा माहेरी आली, परंतु प्रत्येक वेळी लखविंदरचे वडील व नातेवाइक माफी मागून मुलीला परत सासरी न्यायचे. त्यांच्या मुलीला 4 मुली आणि 1 मुलगा आहे. मुलगा अजून वर्षभराचाही नाहीये. 

 

काय म्हणतात पोलिस?
त्रिपडी पोलिस स्टेशनचे इंचार्ज राजेश मल्होत्रा म्हणाले की, आरोपीला अटक करून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्या मंडळींची चौकशी केल्यावर पुढील कारवाई होईल.


मोठ्या बहिणीनेच आणले होते दिराचे स्थळ
वडील म्हणाले की, त्यांच्या मोठ्या मुलीचेही याच घरात लग्न झालेले आहे. तिने छोट्या बहिणीचे दीर लखविंदर सिंहशी लग्न जुळवले. कौटुंबिक कारणांमुळे लग्नानंतर काही दिवसांनी दोघेही भाऊ वेगवेगळे राहू लागले. बुधवारी हत्या झाली तेव्हा मोठ्या मुलीलासुद्धा माहिती नव्हती. तिलाही फोनवरच याची माहिती देण्यात आली. मृत्यूच्या आधी काही वेळापूर्वीच माझ्या मुलीने मोठ्या बहिणीशी फोनवर बोलणे केले होते.  

 

बातम्या आणखी आहेत...