Home | National | Other State | Husband killed his Wife For Watching YouTube Video Late Night on Mobile.

सकाळी 4 पर्यंत युट्यूबवर व्हिडिओ बघत होती महिला, पती म्हणाला - आता झोप' पण तिने ऐकले नाही त्यामुळे तिला कायमची झोपवल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 14, 2019, 05:02 PM IST

घटनेवेळी तेथेच उपस्थित होता 2 वर्षांचा मुलगा

  • Husband killed his Wife For Watching YouTube Video Late Night on Mobile.

    मुंबई - येथील अंधेरी भागात पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. पत्नी सकाळी 4 वाजेपर्यंत यूट्यूबवर व्हिडिओ पाहत होती. यामुळे नाराज झालेल्या पतीला राग आला. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. या दरम्यान पतीने गळा आवळून पत्नीची हत्या केली. चेतन असे आरोपीचे नाव आहे. पत्नीचा खून केल्यानंतर चेतनने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


    डीएसपी नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले की, बुधवारी उशीरा रात्री चेतनचा पत्नीसोबत वाद झाला होता. आरोपीने सांगितले की, त्याने पत्नीला समजवले होते की फिल्म पाहणे बंद कर. पण तिने ऐकले नाही. घडलेल्या घटनेनंतर आरोपीला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला. तो म्हणाला की, माझे मानसिक संतुलन ठीक नव्हते. रागाच्या भरात मी खूप मोठी चूक केली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला एक-दोन वर्षाचा मुलगा आहे. घटनेवेळी तो तेथेच उपस्थित होता.

Trending