आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमविवाहाच्या सहा महिन्यातच पतीने आवळला पत्नीचा गळा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- प्रेमविवाह केल्यानंतर सहा महिन्यांत किरकोळ कारणांतून भांडणाच्या वादातून प्रियकर पतीनेच प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले. बुधवार (दि. ९) सकाळी कॉलेजरोडवरील सत्यम लीला इमारतीच्या टेरेसवर युवतीचा मृतदेह आढळून आला होता. मृत युवतीच्या आईच्या तक्रारीनुसार संशयिताच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर संशयित फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

 

सरला परदेशी (रा. तपोवनरोड, पंचवटी) यांच्या तक्रारीनुसार मुलगी पायल हिचा संशयित जयेश रामचंद्र दामोदर (२३) याच्यासोबत प्रेमविवाह झाला आहे. लग्नाच्या काही दिवसांतच संशयित मुलीशी किरकोळ कारणांवरून भांडण करत होता. मारझोड करून तिला उपाशीपोटी ठेवत होता. रोजच्या जाचाला कंटाळून ती माहेरी आली होती. संशयिताने तिला नेण्यासाठी तगादा लावला. मात्र, पायल जाण्यास तयार नव्हती. अखेर त्याने पायलला काहीतरी आमिष दाखवून सोबत नेत इमारतीच्या गच्चीवर तिचा गळा आवळून खून केल्याची तक्रार परदेशी यांनी दिली आहे. 

 

संशयित झाला फरार, पाेलिस पथक मागावर 
संशयित घटनेच्या दिवसापासून फरार आहे. त्याच्या मागावर पथक आहे. लवकरच तो पकडला जाईल. कारण स्पष्ट झाले आहे. तो मिळाल्यावर माहिती पुढे येईल. - किशोर मोरे, वरिष्ठ निरीक्षक, गंगापूर पोलिस ठाणे 

बातम्या आणखी आहेत...