Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | husband killed his wife with big rock in pimpalner

पतीच्या जाचाला कंटाळून माहेरी गेली होती पत्नी, चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात दगड घालून पतीने घेतला जीव

प्रतिनिधी, | Update - Jun 21, 2019, 06:35 PM IST

4 महिन्यांपुर्वी भारतीबाई माहेरी निघून आली होती

 • husband killed his wife with big rock in pimpalner

  पिंपळनेर- माहेरी आलेल्या पत्नीचा पतीने डोक्यात दगड घालून खून केल्याची खळबळजनक घटना पिंपळनेर जवळील कोकणंगाव पोस्ट शेवगे येथे आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. सुकदेव गायकवाड यांची भाची भारतीबाई हिचा विवाह 2005 मध्ये गोरख एकनाथ चव्हाण(वय35 रा.कातरवेल ता.सटाणा जि.नाशिक)
  याच्याशी झाला होता. भारतीबाईचा पती गोरख हा गेल्या अनेक वर्षांपासून कामधंदा करत नव्हता त्यातच दारुचे व्यसन असल्याने दररोज दारू पिऊन घरात धिंगाणा घालत होता. अनेकदा दारु पिऊन पत्नी भारतीबाईच्या चारित्र्यावर संशय घेवून नेहमी मारहाण करीत असे.

  चारित्र्याच्या संशयावरून घेतला जीव

  गोरख चव्हाण हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेऊन मारहाण करत असल्याने कंटाळलेल्या भारतीबाईने आपल्या माहेरी निघून जाणे पसंत केले. 4 महिन्यांपुर्वी भारतीबाई माहेरी निघून आली होती. तरीदेखील आरोपी गोरख चव्हाण हा शेवगे येथे माहेरी आलेल्या भारतीबाईला नेहमी मारहाण करीत असल्याने पतीच्या जाचक त्रासापासून सुटका व्हावी यासाठी भारतीबाईच्या आईने तिचा भाऊ सुकदेव गायकवाड यांच्याकडे भारतीबाई आणि तिच्या दोघा मुलांना शेवगे येथून जवळच असलेल्या कोकणंगाव ता.साक्री येथे पाठवून दिले.

  गेल्या दोन महिन्यांपासून भारतीबाई ही मामा सुकदेवकडे आनंदाने राहत होती. परंतु आज (दि.21) रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास मामा सुकदेव गायकवाड, तानाजी माळी आणि दीपक माळी हे तिघे त्यांच्या स्वतःच्या घराजवळ उभे होते. तर भारतीबाई ही घराबाहेरच कपडे धुण्यासाठी बसलेली असतांना तिचा पती गोरख एकनाथ चव्हाण हा अचानक भारतीबाईजवळ आला आणि तुला आज मारुन टाकतो अशी चिथावणी देत गोरखने त्याच्या हातातील मोठ्या दगडाने भारतीबाईच्या डोक्यात हल्ला चढवला. हा हल्ला इतका गंभीर होता की या हल्ल्यात भारतीबाईच्या डोक्यातून रक्तस्रावासह मेंदू देखील बाहेर आला. या हल्ल्यात भारतीबाईचा जागीच मृत्यू झाला.


  घटनेची माहिती पोलिस पाटलांनी पिंपळनेर पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले आणि शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान मृत भारतीबाईचे मामा सुकदेव काळू गायकवाड यांनी पिंपळनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार मृत महिलेचा पती गोरख चव्हाण याच्या विरोधात पिंपळनेर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

  आरोपी त्वरित गजाआड

  घटनेनंतर आरोपी गोरख चव्हाणने घटनास्थळावरून पळ काढला होता परंतु त्यांची माहिती घेत पिंपळनेर पोलिसांनी घटना घडल्यानंतर त्वरित त्याला ताब्यात घेतले असून, उद्या शनिवारी साक्री न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पंजाबराव राठोड करीत आहेत.

 • husband killed his wife with big rock in pimpalner
 • husband killed his wife with big rock in pimpalner

Trending