आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीचा आवाज ऐकून कुटुंबीयांना आली जाग, इच्छा असूनही करू शकले नाही मदत; शेजाऱ्यांनी दार उघडताच भिंतीवर दिसले रक्ताचे शिंतोडे, बाजूलाच होता कापलेला पंजा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लूणकरणसर/काकडवाला- संपत्तीच्या वादातून पतिने पत्नीवर तलवारीने वार करुन तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चंदा असे मृत पत्नीचे नाव असून भवानीदान पतीचे नाव आहे. 13 वर्षांआधी दोघांचा विवाह झाला होता. परंतू अनेक महिन्यांपासून दोघांमध्ये संपत्तीवरुन वाद सुरू होते. 

 

पोलिसांनी सांगितल्यानुसार, मृत चंदा दीड वर्षांपासून काकाडवालात आपल्या बहिनीकडे राहत होती. मंगळवारी रात्री साडेबारा वाजता आरोपी भवानीदान तलवार घेऊन मृत चंदा राहत असलेल्या घरी पोहचला. घराच्या तीन खोल्यांमध्ये झोपणाऱ्या सदस्यांनी बाहेर येऊ नये यासाठी त्याने तीन्ही खोल्यांचे दार बाहेरून बंद केले. त्यानंतर चौथ्या खोलीत झोपलेल्या मृत चंदाचा दरवाजा खोलला आणि तिने प्रतिकार करायच्या आतच त्याने तलवारीने हल्ला केला. तिचा आवाज ऐकून घरातील इतर सदस्य जागे झाले परंतू खोल्यांना बाहेरुन कडी-कोंडा लावला असल्याने त्यांना मृत चंदाची मदत करणे अशक्य झाले. मृत चंदाचा आवाज ऐकून शेजारचे तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी घराच्या इतर खोल्यांचे दरवाजे उघडून कुटुंबियांना बाहेर काढले. परंतू तेवढ्या वेळेत आरोपी भवानीदान घरातून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.   

 

घरातील कुटुंबिय मृत चंदाच्या खोलीत पोहचल्यानंतर त्यांनी तातडीने तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतू उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आरोपी भवानीदानने घटना घडल्यानंतर घटनास्थळावरून जवळपास 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या जगंलात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

पत्नीवर केलेला हल्ला इतका गंभीर होता की तुटली तलवार
आरोपी भवानीदानने पत्नी मृत चंदाच्या खोलीचा दरवाजा उघडताच तिच्यावर तलवारीने हल्ला केला. हल्ला इतका गंभीर होता की त्यात तिच्या हाताची बोटे आणि दुसऱ्या हाताचा पंजा तुटून बाजूला पडला. त्यानंतर आरोपी भवानीदानने मृत चंदाच्या पायावर इतक्या वेगाने वार केला की, तलवारीचे दोन तुकडे झाले. मृत चंदाच्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये तिच्या शरीरावर एकून 14 ठिकाणी वार केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन तलवारीचे तुकडे ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...