आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Murder: पोलिस पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा पती, कत्तीने वार करून केली निर्घृण हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

उन्नाव सिटी पोलिसांत तैनात होती हेड कॉन्स्टेबल.


कानपूर - येथे एका व्यक्तीने मंगळवारी सकाळी हेड कॉन्स्टेबल पत्नीची कत्तीने वार करून हत्या केली. मुलाने याचा विरोध केल्यावर त्याच्यावरही हल्ला चढवला. मुलाने बापाला एका रूममध्ये बंद केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता.

 

असे आहे प्रकरण
कर्रही रोडवरील रहिवासी शारदा सिंह या यूपी पोलिसांत हेड कॉन्स्टेबल पदावर उन्नावमध्ये तैनात होत्या. नुकतेच त्यांचे शिपाई पदावरून प्रमोशन झाले होते. कुटुंबात पती वीरेंदर आणि दोन मुले गोलू (21) व छोटू (18) आहेत. सोमवारी संध्याकाळी शारदा या उन्नाववरून ड्यूटी संपल्यानंतर परतल्या. रात्री जेवणानंतर मोठा मुलगा गोलूसोबत त्याच्या रूममध्ये झोपल्या.

वीरेंदर रूममध्ये झोपण्यासाठी गेला. मंगळवारी सकाळी साडे चार वाजता गोलू टॉयलेटला जाण्यासाठी उठला. तेवढ्यात वीरेंदर गूपचूप उठला आणि त्याने टॉयलेटचे दार बाहेरून बंद केले. यानंतर कत्ती घेऊन शारदावर हल्ला चढवला.

 

शारदा ओरडल्यावर गोलूला अनर्थाची जाणीव झाली. त्याने जोराने धक्का देऊन टॉयलेटचे दार उघडले. तो पळतच रूममध्ये पोहोचला तेव्हा वीरेंद्रने त्याच्यावरही हल्ला केला. कसेबसे मुलाने बापाला धरून रूममध्ये बंद केले. यानंतर पोलिस आणि नातेवाइकांना घटनेची माहिती दिली. जखमी शारदाला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

 

मृत शारदा यांचा मोठा मुलगा गोलू म्हणाला की, पप्पाला मम्मीच्या चारित्र्यावर संशय होता. ते पोलिस स्टेशनला तिच्यासोबत जायचे आणि घेऊनही यायचे. आईचे कॉल डिटेलही चेक करायचे. यामुळेच नेहमी दोघांत वाद होत राहायचा. कधी-कधी पप्पा न सांगताही मम्मीच्या पोलिस स्टेशनला जायचे. 


पोलिस अधिकारी आर. के. चतुर्वेदी म्हणाले की, आरोपी बापाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. घटनेची चौकशी सुरू आहे. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

 

 

बातम्या आणखी आहेत...