आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Murder: शाळा सुरू असतानाच मुख्याध्यापिकेवर कुऱ्हाडीने हल्ला, रक्ताचा सडा पाहून विद्यार्थ्यांमध्ये घबराट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोंदिया - येथील गोंदिया तालुक्यात असलेल्या इर्री जिल्हा परिषद शाळेत दिवसा-ढवळ्या मुख्याध्यापिकेचा खून करण्यात आला आहे. हल्लेखोर त्या महिलेचा पती असून शाळा सुरू असतानाच त्याने हा हल्ला केला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. यातील आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. हा खून विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला. त्यामुळे, शाळा आणि गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.


इर्री गावातील जिल्हा परिषदेची शाळा मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणेच भरली होती. त्याचवेळी अचानक एक हल्लेखोर दिलीप हातात धारदार डोंगरे कुऱ्हाड घेऊन घुसला. त्याने शाळेत येताच मुख्याध्यापिका प्रतिभा डोंगरे यांच्यावर सपा-सप वार केले. या हल्ल्यात रक्तबंबाळ होऊन प्रतिभा जागीच कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. रक्ताचा सडा पाहून विद्यार्थ्यांनी एकच ओरड सुरू केली. शाळेत गावकऱ्यांनी गर्दी केली. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस आणि गावकरी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आरोपी पसार झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच आरोपी पतीचा सध्या कसून शोध घेतला जात आहे.