आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Lethal Affair: नवविवाहित दीरासोबत एकांतात होती भावजयी, नववधूने रंगेहात पकडले; मग घडले असे काही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ - अनैतिक संबंधांमध्ये आंधळा माणूस कधी हैवान बनतो याचा त्या माणसाला देखील पत्ता लागत नाही. अशात नाते-संबंध तर सोडाच साध्या माणुसकीचा सुद्धा लोक विचार करत नाहीत. असेच एक ताजे प्रकरण उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर येथे शनिवारी समोर आले आहेत. येथे राहणाऱ्या एका नवविवाहित युवकाला त्याच्या नववधूने वहिणींसोबत शीरीरिक संबंध प्रस्थापित करताना रंगेहात पकडले. त्यावर आरोपी पतीला इतका राग आला की त्याने आपल्या पत्नीला वहिणीसमोरच बेदम मारहाण सुरू केली. मारहाणही इतकी की तिचा मृत्यूच झाला. 


सुरुवातीला केले दुर्लक्ष
पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे, तिचा पती अर्जुननेच बेदम मारहाण करून आपल्या पत्नीचा जीव घेतला. अर्जुन नावाच्या युवकाचा 3 महिन्यांपूर्वी शहाजहांपूर जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीशी विवाह झाला. परंतु, विवाह झाल्याच्या अवघ्या काही दिवसांतच घरात आपल्या पती आणि वहिणीच्या वर्तनावर तिला संशय आला. सुरुवातीला तिने हा आपला गैरसमज असावा असा विचार करून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. परंतु, एक दिवस असा आला की तिच्या पायाखालची जमीनच घसरली. 


बाहेरून अचानक घरी आली तेव्हा...
पीडितेच्या कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे, लग्नाच्या 3 महिन्यांनंतर अर्थातच शुक्रवारी (21 सप्टेंबर) नववधू कामानिमित्त घराबाहेर गेली होती. परंतु, काम झालेच नसल्याने ती कुणालाही न सांगता वेळीच घरी परतली. घरात कुणीही दिसत नव्हते. परंतु, आपल्या बेडरुममधून येणारे आवाज ऐकूण तिचे लक्ष विचलित झाले. दार उघडेच असल्याने तिने धक्का दिला. आत तिचा पती आणि त्याची वहिणी अतिशय खासगी क्षणांमध्ये होते. काय करावे काहीच सुचत नव्हते. ती अगदी चेतनाशून्य झाली. तेवढ्यात त्या दोघांनी तिला पाहिले आणि उलट तिच्यावरच आपला राग काढला. यानंतर रागाच्या भरात पतीने पत्नीला एवढी मारहाण केली की तिचा जीव गेला. 


हत्या करून आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न...
आपल्या पत्नीच्या हालचाली बंद झाल्याचे पाहता अर्जुन घाबरला. जणू अचानक शुद्धीवर आल्याप्रमाणे त्याने पत्नीचा श्वास तपासला. मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचे पाहता. दीर-भावजयीने या हत्येला आत्महत्या दाखवण्याचा कट रचला. बेडरुममध्येच गळफास तयार करून पीडितेचा मृतदेह त्यावर लटकवला. तसेच सर्वांना पीडितेने आत्महत्याच केली असे दाखवले. परंतु, शवविच्छेदन अहवालात आरोपींचे नाटक उघडकीस आले. यानंतर पोलिसांनी दोघांच्या विरोधात हत्येचा खटला दाखल करून त्यांना अटक केली.

 

बातम्या आणखी आहेत...