आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला सोबत पाठवण्यास केली मनाई; जावयाने गाढ झोपेतील मेहुण्याच्या डोक्यात पाटा घालून केला खून

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- पत्नीला सोबत न पाठवणाऱ्या सासू आणि मेव्हण्यावर जावयाने जीवघेणा हल्ला केला. यात मेव्हण्याचा मृत्यू झाला तर सासू गंभीर जखमी झाली. ही खळबळजनक घटना सेनगाव येथे बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास घडली. मन्मथ महाजन असे मृताचे नाव असून आरोपी राजू आवटे यास पोलिसांनी अटक केली आहे. 

 

मन्मथची बहीण पतीच्या त्रासामुळे सेनगावला माहेरी आली होती. तिला घेऊन जाण्यासाठी सेनगाव येथे त्याचा मेव्हणा राजू आवटे (हयातनगर ता. वसमत) हा ८ जानेवारी रोजी आला होता. मात्र सासरी नेहमीच त्रास होत असल्याने मुलीला सासरी पाठवण्यास महाजन कुटुंब तयार नव्हते. त्यामुळे राजू आवटे आणि मन्मथ महाजन यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. काही लोकांच्या मध्यस्थीने हे भांडण कसे बसे मिटले. रात्री जेवण झाल्यानंतर घरात सर्व जण झोपले होते. मध्यरात्री १ च्या सुमारास सर्व जण गाढ झोपेत असताना राजू आवटे याने मेव्हणा मन्मथ आणि सासू रमाबाई यांच्यावर जोरदार हल्ला केला. त्याने मन्मथच्या डोक्यात खलबत्ता घातला. मन्मथ आणि रमाबाई या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या. हल्ला करून राजू आवटे हा फरार झाला. या घटनेमुळे घरात एकच आरडाओरड निर्माण झाल्याने शेजाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मन्मथ महाजन याला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. घटनास्थळी सेनगाव पोलिस ठाण्याचे पो.नि. सरदारसिंह ठाकूर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तसेच घटनास्थळी ठसेतज्ज्ञ दाखल झाले असून घटनेचा पंचनामा केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन सेनगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...