आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायको प्रेग्नेंट असताना अचानक झाला पतीचा मृत्यू; लाखाेंचे कर्ज होते, पण घरात ओव्हनवर नजर जाताच फळफळले नशीब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटन - ब्रिटनमध्ये राहणाऱ्या अमांडा रसकिंस 36 आठवड्यांच्या प्रेग्नंट होत्या, तेव्हा अचानक अचानक त्यांच्या पतीच्या निधनाचे वृत्त आले. हे ऐकताच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. पतीच्या निधनानंतर त्यांच्या डोक्यावर पतीचे तब्बल 7 लाख रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज त्यांच्या पतीने घर खरेदी करण्यासाठी घेतले होते. परंतु एका दिवशी एका न्यूज चॅनलने त्यांचे नशीब बदलले.

 

इंटरव्ह्यूदरम्यान चमकले नशीब...
- अमांडाने एका लोकल चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये आपली इमोशनल कहाणी सांगितली. यादरम्यान त्यांना हे सरप्राइज मिळाले. अमांडाने म्हटले, तीन वर्षांपासून आम्हाला मूल होत नव्हते. मोठ्या मुश्किलीने मी प्रेग्नंट झाल्याने आम्ही दोघेही खूप खुश होतो. माझ्या पतीने फॅमिली प्लानिंग केली आणि आम्ही आमचे कुटुंब वाढवण्यासाठी घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी कर्ज घेतले होते. अमांडाने म्हटले, प्रेग्नन्सीदरम्यान यापेक्षा मोठा धक्का माझ्यासाठी दुसरा असूच शकत नव्हता. माझ्या पतीने माझी सोथ सोडली अन् मला घरही सोडावे लागले असते. आधीच पैशांची चणचण अन् आता पतीच्या कर्जामुळे माझ्या अडचणी वाढल्या होत्या.

- प्रेग्नेंट महिलेची ही भावुक कहाणी ऐकल्यानंतर चॅनलने तिची अशी मदत केली, जिचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता.

 

नोटांनी भरलेले होते ओव्हन
- वास्तविक, ज्या वेळी अमांडा आपली कहाणी चॅनलला ऐकवत होती. त्यादरम्यान चॅनलची एक टीम तिच्या घरी पोहोचली होती. तिला टीव्हीवर दाखवण्यात आले की, तिच्या किचनच्या ओव्हनमध्ये तेवढाच पैसा ठेवण्यात आला आहे, जेवढे तिच्या पतीचे कर्ज होते. हा पैसा स्वत: न्यूज चॅनलने तिथे ठेवला होता. हे पाहताच अमांडा चकित झाली आणि ढसाढसा रडू लागली. एवढेच नाही, एकट्या पडलेल्या अमांडाला चॅनलने तिच्या दैनंदिन वापराच्या वस्तू, खाण्यापिण्याचे सामान आणि होणाऱ्या बाळासाठी बेबी केअर प्रोडक्टही गिफ्ट म्हणून दिले. चॅनलच्या अँकर त्यांना म्हणाल्या की, आता त्यांना आपले घर सोडावे लागणार नाही. त्यांनी स्वत:ला एकटे समजू नये.

 

कसे झाले हे सर्व?
- वास्तविक, अमांडाच्या पतीच्या निधनानंतर त्या एकट्या पडल्या होत्या. यानंतर अमांडाच्या एका मैत्रिणीने तिची कहाणी एका न्यूज चॅनलला लिहून पाठवली. चॅनलने अमांडाला स्वत:ची कहाणी शेअर करण्याचे सांगून ऑफिसात बोलावले. यादरम्यान तिला हा सुखद धक्का देण्यात आला.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, अमांडाचे आणखी Photos...

बातम्या आणखी आहेत...