आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Tik Tok मुळे सापडला पती; तीन वर्षांपूर्वी जिच्यामुळे सोडून गेला, तिच्यासोबतच काढलेल्या व्हिडिओमुळे झाली फजिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृष्णगिरी(तमिळनाडू)- भारतात Tik Tok अॅपचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलाय. कमी वेळेत Tik Tok एक मनोरंजनाचे माध्यम म्हणून प्रसिद्धीस आले आहे. याचा दुरुपयोगही झाला होता, त्यामुळे काही दिवसांपूर्वी या अॅपवर बंदी आणली होती. पण नंतर याची बंदी उठवण्यात आली. याच अॅपने तमिळनाडूतील एका महिलेला तिचा तीन वर्षापूर्वी हरवलेल्या पतीचा शोधण्यास मदत केली आहे. Tik Tok मुळे पतीचा शोध लागल्याने सर्वत्र या प्रकरणाची चर्चा होत आहे.


काय आहे प्रकरण ?
तीन वर्षापूर्वी भांडण झाल्यामुळे महिलेचा पती घर सोडून निघून गेला होता. पती घर सोडून गेल्यामुळे पत्नी जयाने त्याचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. यानंतर तिने पोलिस स्टेशनमध्येही पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पण कुठेच पतीचा शोध लागला नाही. जयाचा पती एका ट्रॅक्टर कंपनीत मेकॅनिक म्हणून काम करत होता. पती सोडून गेल्यानंतर जयाने अनेक अडचणींचा सामना करत काम केले आणि आपल्या दोन मुलांचा सांभाळ केला. 


काहीदिवसांपूर्वी जयाच्या एका नातेवाईकाने Tik Tok वर एक व्हिडीओ पाहिला ज्यामध्ये जयाचा पती सुरेश एका तृतीयपंती महिलेसोबत दिसला, हा व्हिडीओ त्यांनी जयाला दाखवला. पती-पत्नीमध्ये भांडण याच तृतीयपंतीमुळे झाले होते. नातेवाईकांनी व्हिडीओ दाखवल्यानंतर जयाने या व्हिडीओबद्दल सर्वत्र चौकशी केली. यानंतर पोलिस स्टेशनला तक्रार देत पोलिसांनी इतर तृतीयपंतीयांच्या मदतीने सुरेशला शोधून काढले.

बातम्या आणखी आहेत...