आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीने पत्नीसाठी तयार केला टाइम टेबल; रोज सकाळी 6.30 ला उठ, सासुला गुड मॉर्निंग म्हण, दिराला जेवलात का विचारायचे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदुर(मध्य प्रदेश)- "सोमवार ते रविवार सकाळी 6.30 ते 7 दरम्यान झोपेतून उठायचं, 7.30 ला सासुला गुड मॉर्निंग म्हणायचं, नंतर मला उठवून दिवसभारातली महत्त्वाची कामे विचारायची आणि 11 पर्यंत सगळी कामे पूर्ण करायची. त्यानंतर दुपारी दिरासाठी जेवण तयार करायचे." हा टाइम टेबल एखाद्या मोलकरनीचे नसून, एका पतीने आपल्या पत्नीसाठी तयार केला आहे. यात दिलेली कामे वेळेवर पूर्ण न झाल्यास पत्नीला चपलेने मारहाण केली जायची. या जाचाला कंटाळून गोमाच्या फेलमध्ये राहणाऱ्या मेघा वर्मा या महिलेने पती दिनेश उर्फ गोलू वर्मा, दिर देवेंद्र आणि सासू दुर्गाबाईविरूद्ध आत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

 

मेघाने पोलिसांना सांगितले की, मुख्यमंत्री सामुहिक विवाह योजनेत तिचे लग्न 19 फेब्रुवारी 2019 ला दिनेशसोबत झाले. योजनेत मिळालेले 48 हजार रुपये सासुने ठेऊन घेतले आणि लग्नाच्या काही दिवसानंतर त्रास देणे सुरू केले. हूंडा न दिल्यामुळे रोज टोमणे मारले जायचे. त्याशिवाय दोन लाख रूपये मागत होते. काही दिवसात इतका त्रास दिला की, वडिलांना खोटं बोलून त्यांच्याकडून 2 लाख रूपये आणून सासुला दिले. यामुळे माझ्या सासु, पती आणि दिरामध्ये लालच सुरू झाली. काही दिवसानंतर आणखी दोन लाख रूपये त्यांनी मागितले. नकार दिल्यावर पतीने त्रास देणे सुरू केले, अनेकवेळा मारहाण केली. त्यानंतर मला एक टाइम टेबल तयार करून दिला आणि सोमवारपर्यंत त्याचे पालन न केल्यास मारहाण करेल अशी धमकी दिली.

 

टाइम टेबलमध्ये लिहीले- घरातील सगळी कामे सासुला विचारून करायची
"सकाळी 6.30 ते 7.00 वाजता झोपेतून उठायचं, 7.30 वाजता मम्मी(सासू)ला उठवून गुडमॉर्निंग म्हणायचं. त्यानंतर मम्मीला चहा हवाय का ते विचारायचं? नंतर 8 वाजता पतीला उठवायचं, तसेच 9 पर्यंत घराची साफ-सफाई करायची. 11 पर्यंत सगळी कामे पूर्ण करावे लागतील.1 वाजता दिराला जेवण द्यायचे. त्यानंतर 3 वाजता पती आणि मम्मीला जेवण द्यायचे. 5 वाजता मम्मीला चहा द्यायचा." हा असा टाइम टेबल पतीने महिलेला दिला होता.


आत्याचार करून मोबाइल घेणे, माहेरी जाऊ न देणे
मेघाचा आरोप आहे की, तिचा मोबाईल घेतला. तसेच वडील आणि दोन्ही भावावर तेजाब टाकून जीवे मारण्याची धमकी दिली. तिची तब्येत ठीक नव्हती तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलमधून औषधे आणले. महिलेच्या आईला या गोष्टीची माहिती लागताच त्यांनी तिला घरी आणले. एका तासानंतर पती, सासू आणि दिर तिच्या घरी गेले आणि मेघाच्या अपंग वडिलांना मारहाण केली. त्यांच्या या आत्याचाराला कंटाळून पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी पती, सासू आणि दिराला ताब्यात घेतले आहे.