Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | husband Mangesh had burnt his wife with petrol

अहमदनगर जळित कांड : पती मंगेशनेच रुक्मिणीस पेट्रोल टाकून जाळल्याचे निष्पन्न

प्रतिनिधी | Update - May 12, 2019, 09:02 AM IST

या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक बाबी पुढे आल्या

  • husband Mangesh had burnt his wife with petrol

    पारनेर - निघोज येथील रुक्मिणी या विवाहितेला जिवंत जाळण्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी विवाहितेचा पती मंगेश रणसिंग याने निघोज येथील राजेंद्र लाळगे यांच्या मळगंगा पेट्रोलियम या पेट्रोलपंपावरून पेट्रोल खरेदी केले, हे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या पंपावरील घटना घडली, त्या दिवसाचे (१ मे) सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून मंगेश पेट्रोल खरेदी करीत असल्याचे दिसत आहे, अशी माहिती या प्रकरणतील तपासी अधिकारी, सहायक पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली.


    या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक बाबी पुढे आल्या. रुक्मिणीचा धाकटा भाऊ रितेन ऊर्फ नंचू याचा आणि घटनास्थळी असणाऱ्या लोकांचे जबाब महत्त्वपूर्ण ठरले. त्यातच रुक्मिणीने जबाबातही मंगेशनेच अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्याचे सांगितले होते. या पुराव्याच्या आधारे मंगेश आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, रुक्मिणीचे वडील, काका, मामा यांच्या विरोधात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत.त्यामुळे पोलिसांनी तसा अहवाल न्यायालयात सादर केला. रामफल भरतिया, सुवेंद्रकुमार भरतिया, धनश्याम राणेज यांना या गुन्ह्यातून वगळण्याची विनंती न्यायालयाला केली.

Trending