आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुचंद्राच्या रात्री अचानक पतीला आली जाग, एकटाच बेडवर पाहून घेतला पत्नीचा शोध, मग दिसले भयंकर सत्य!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बैतूल (एमपी) -  पती-पत्नीच्या नात्यात तिसरा आल्यावर नेहमीच सुखी संसारात वादळ उठताना दिसते. पतीने पत्नीला किंवा पत्नीला पतीला धोका देण्याच्या घटना नवीन नाहीत. अशीच घटना एमपीच्या आठनेर परिसरात घडली होती. मेमध्ये आढळलेल्या नवविवाहितेच्या छिन्नविछिन्न मृतदेहाची पोस्टमॉर्टम रिपोर्ट येताच पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले. नवविवाहितेची हत्या तिच्या पतीनेच डोक्यात दगड घालून केली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

 

असे आहे प्रकरण...
- पोलिसांनी सांगितले, अनिता (22) हिचे लग्न 24 एप्रिल रोजी सुखारामशी झाले होते. अनिता 25 एप्रिल रोजी पतीसोबत माहेरी आली होती.
- 29 एप्रिल रोजी रात्री अचानक ती घरातून गायब झाली. कुटुंबीयांनी तिच्या सासरच्या मंडळींसह आपल्या नातेवाइकांच्या घरी शोघ घेतला, परंतु अनिताचा काही ठावठिकाणा लागला नाही.
- 2 मे रोजी संध्याकाळी लोकांना शाळेच्या मागे सुनसान जागेवर अनिताचा मृतदेह आढळला, जो जनावरांनी कुरतडला होता.

- नवविवाहितेच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी भोपाळ येथे पाठवण्यात आले, तेथे मृतदेहावर जखमा आढळल्या. याआधारावर पोलिसांनी तिचा पती सुखारामची चौकशी केली.
- पीएम रिपोर्टमध्ये हत्येचा खुलासा झाल्याने संशयाच्या आधारे पतीची चौकशी केली असता त्याने हत्येचा गुन्हा कबूल केला. -पी .एस. ठाकूर, एसडीओपी, भैंसदेही.

 

असे पोहोचले आरोपीपर्यंत...
- अनिताचा मृतदेह पोलिसांना अतिशय वाईट अवस्थेत आढळला होता. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मृतदेह पाहून पोस्टमॉर्टम करायला नकार दिला. 
- यानंतर पोलिसांनी भोपाळला मृतदेह पाठवून पोस्टमॉर्टम करायला लावले. पीएम रिपोर्टमध्ये डोक्यात फ्रॅक्चर आणि मानेचे हाड मोडून मृत्यू झाल्याचे आढळले.
- रिपोर्ट मिळताच पोलिसांनी पती सुखराम हिरू पंद्राम यांची कडक चौकशी केली असता त्याने हत्येचा गुन्हा कबूल केला.

 

आरोपी म्हणाला- एका तरुणाशी होते पत्नीचे अवैध संबंध
- आरोपी पती सुखरामने सांगितले की, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पत्नीसोबत तो सासरी आला होता. चार दिवसांपर्यंत पत्नी दुसऱ्या रूममध्ये झोपत होती.
- 29 एप्रिल रोजी आमचा मधुचंद्र असल्याने ती माझ्यासोबत झोपली. रात्री 12 वाजता माझा डोळा उघडला तेव्हा ती बेडवर नव्हती.
- थोडा वेळ वाट पाहून मी जवळपास शोधायला सुरुवात केली. यानंतर घरामागे जाऊन पाहिले असता एक मुलगा व एक मुलगी अंधारात जाताना दिसले.
- मी त्यांचा पाठलाग केला तेव्हा तो मुलगा मला पाहून पळून गेला. आणि ती मुलगी माझी पत्नी अनिताच निघाली. मी पत्नीला विचारले- तू एवढ्या रात्री त्या मुलाबरोबर कुठे जात होतीस?
- तिने काहीच उत्तर दिले नाही, तेव्हा मी तिला दोन थापडा लगावल्या. मी तिला घटस्फोटाची मागणी केली. अनिता म्हणाली, माझी मर्जी मी देईन, नाहीतर नाही.
- यावर माझा रागाचा पारा चढला आणि मी तिला उचलून डोक्यावर आदळली. यानंतर दगडाने तिच्या डोक्याचा चेंदामेंदा केला आणि घरातून येऊन पुन्हा झोपलो.
- रात्री 3 वाजता सासरच्यांना म्हणालो, अनिता घरात नाही, कुठे गेली? जेणेकरून माझ्यावर कुणाला संशय येऊ नये.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज... 

 

बातम्या आणखी आहेत...