आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Husband Murder Then Wife Escaped With Her Lover In Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या करून पत्नी प्रियकरासोबत झाली रफुचक्कर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या करून पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोपी नाईक (30) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो सफाई कामगार होता. प्रिया नाईक असे आरोपी महिलेचे नाव असून तरी प्रियकर महेश कराळे याच्यासोबत पसार झाली आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्‍यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

 

मिळालेली माहिती अशी की, गायमुख येथील पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या श्रमसाफल्य या इमारतीत गोपी, पत्नी प्रिया व आठ वर्षीय मुलीसह राहत होता. प्रिया व महेश कराळे याचे विवाहबाह्य अनैतिक संबंध होते. त्यावरून नाईक पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते. या वादातून प्रियाने महेशच्या मदतीने गोपीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला. दोघांनी जखमी अवस्थेत गोपीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गोपीचा अपघात झाल्याचा दोघांनी हॉस्पिटलमध्ये बनाव केला. मात्र, गोपीवर उपचार सुरु होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झशला. डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केल्याचे पाहाताच प्रिय आणि महेश या जोडगोळी हॉस्पिटलमधून पसार झाली.